
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने जीबीएच इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टिंग एलएलसी या दुबई आणि संयुक्त अरब अमिरातीस्थित कंपनी सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आरव्हीएनएल कंपनीने याबाबत स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमार्फत माहिती देताना म्हटले आहे की, ‘आखाती सहकार्य परिषद देशांमध्ये नागरी पायाभूत सुविधा क्षेत्रातील व्यावसायिक संधींचा शोध घेण्यासाठी दोन्ही कंपन्या एकत्र काम करतील.’
कंपनीने यापूर्वी एक सामंजस्य करार केला
यापूर्वी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने विशाखापट्टणम बंदर प्राधिकरणासोबत मालाची सुरळीत वाहतूक वाढविण्यासाठी अंतर्गत उड्डाणपूल बांधणे आणि व्हीपीए येथे वाहतुकीच्या मुक्त प्रवाहात अडथळा ठरणारे 11 लेव्हल क्रॉसिंग काढून टाकण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने याबाबत माहिती दिली आहे.
आरव्हीएनएल शेअर टार्गेट प्राईस
ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आरव्हीएनएल शेअरबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लॉन्ग टर्म गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे आहे. आरव्हीएनएल शेअरला ४१० ते ४२० रुपयांच्या पातळीवर सपोर्ट आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आरव्हीएनएल शेअरसाठी 510 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे, तर 560 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे.
आरव्हीएनएल शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात आरव्हीएनएल लिमिटेड शेअर 2.41% घसरला आहे. मागील १ महिन्यात आरव्हीएनएल शेअर 11.38% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 26.31% घसरला आहे. मागील १ वर्षात आरव्हीएनएल शेअरने 129% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आरव्हीएनएल शेअरने 1,558.05% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 2,011.39% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर आरव्हीएनएल कंपनी शेअर 3.12% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.