
Tata Motors Share Price | गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी नकारात्मक जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. बीएसई सेन्सेक्स 214.33 अंकांनी घसरून 77,934.16 वर पोहोचला होता आणि एनएसई निफ्टी 55.25 अंकांनी घसरून 23,633.70 वर पोहोचला होता. या घसरणीत येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी सकारात्मक तेजीचे संकेत दिले आहेत.
टाटा मोटर्स कंपनी शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर 0.86 टक्क्यांनी घसरून 788.15 रुपयांवर पोहोचला होता. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,179 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 717.70 रुपये होता. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 2,90,864 कोटी रुपये आहे.
येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – टाटा मोटर्स शेअर टार्गेट प्राईस
येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे टेक्निकल रिसर्च तज्ज्ञ लक्ष्मीकांत शुक्ला म्हणाले की, ‘टाटा मोटर्स शेअर गेल्या पाच महिन्यांत १,१७९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून ३९ टक्क्यांनी घसरला आहे. महत्त्वाचं म्हणजे दीर्घ कालावधीनंतर टाटा मोटर्स शेअर २०-दिवस आणि ५०-दिवसांच्या एसएमएच्या वर गेला आहे, ज्यामुळे तेजीचे सकारात्मक संकेत दिसत आहेत. दैनंदिन चार्टवर 800 रुपयांच्या वर चार दिवसांचा कंसोलिडेशन ब्रेकआऊट झाल्यास शेअर 850 रुपये टार्गेट प्राईस गाठू शकतो. मात्र गुंतवणूकदारांनी 760 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा.
टाटा मोटर्स कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात टाटा मोटर्स कंपनी शेअरने 2.52% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात टाटा मोटर्स कंपनी शेअर 1.33% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 22.35% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा मोटर्स कंपनी शेअर 1.46% घसरला आहे. मागील ५ वर्षात टाटा मोटर्स कंपनी शेअरने 301.40% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 2,383.93% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर टाटा मोटर्स कंपनी शेअरने 6.37% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.