
BEL Share Price | गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी सुद्धा शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दरम्यान, ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट विश्लेषकांनी डिफेन्स कंपनी शेअर्ससाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट विश्लेषक गौरांग शहा यांनी बीईएल शेअर्ससाठी टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरसाठी महत्वाची अपडेट
गुंतवणूकदारांना असा प्रश्न पडला आहे की, भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर प्राईस दुप्पट होईल का? ज्या गुंतवणूकदारांना भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट ठरू शकते. चला तर जाणून घेऊया भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर्स गुंतवणुकीबाबत विश्लेषकांनी काय म्हटले आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअर 0.86 टक्क्यांनी घसरून 282.10 रुपयांवर पोहोचला होता. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 340.50 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 171.75 रुपये होता. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 2,06,794 कोटी रुपये आहे.
BEL शेअर टार्गेट प्राईस
ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर संवाद साधताना स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गौरांग शहा यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. गौरांग शहा यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘बाय’ रेटिंग सह ३२५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. गौरांग शहा पुढे म्हणाले की डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्सची ऑर्डरबुक मजबूत आहे. तसेच पुढेही कंपनीला मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा अंदाज असल्याने तज्ज्ञ देखील भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीवर उत्साही आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.