
Yes Bank Share Price | गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी येस बँक लिमिटेड शेअर 0.65 टक्क्यांनी घसरून 18.23 रुपयांवर पोहोचला होता. आता येस बँक लिमिटेड शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या जवळ पोहोचला आहे. दरम्यान, येस बँक लिमिटेडने महत्वाची अपडेट दिल्याने त्याचा थेट परिणाम शेअर प्राईसवर होणार आहे.
येस बँक लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप सध्या 57,215 कोटी रुपये आहे. येस बँक लिमिटेड शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 32.85 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 17.06 रुपये होती.
येस बँक लिमिटेड शेअरची ट्रेडिंग रेंज
15 जुलै 2005 रोजी येस बँक लिमिटेड शेअर 12.37 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या येस बँक लिमिटेड शेअर 18.34 रुपयांवर ट्रेड करतोय. शेअरची बुधवारची बंद किंमत 18.35 रुपये होती. गुरुवारी दिवसभरात येस बँक शेअर 18.04 रुपये ते 18.36 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील एक वर्षात येस बँक लिमिटेड शेअर 17.06 रुपये ते 32.85 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.
येस बँकेने अपडेट दिली
येस बँक लिमिटेडने स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमार्फत माहिती दिली आहे की, ‘चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीच्या आर्थिक निकालांवर विचार करून त्याला मंजुरी देण्यासाठी शनिवार २५ जानेवारीला येस बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडणार आहे.
फायलिंग मध्ये येस बँकेने म्हटले आहे की, ‘येस बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक 25 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बँकेच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल आणि नऊ महिन्यांच्या बँकेच्या लेखापरीक्षण न केलेल्या स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निकालांचा विचार करून त्याला मंजुरी देण्यात येईल, असे बँकेने म्हटले आहे.
वेल्थमिल्स सिक्युरिटीज ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला
वेल्थमिल्स सिक्युरिटीज ब्रोकिंग फर्मचे स्टॉक मार्केट विश्लेषक क्रांती बथिनी यांनी येस बँक शेअरसंदर्भात सल्ला देताना म्हटले की, ‘येस बँकच्या बिझनेस फंडामेंटलमध्ये सध्या कोणतेही सकारात्मक संकेत दिसत नाहीत. मात्र, ज्या गुंतवणूकदारांकडे उच्च जोखीम क्षमता असेल ते हा शेअर ‘HOLD’ करू शकतात. स्टॉक टेक्निकल चार्टवर येस बँक शेअरला 18.8 रुपये आणि 18 रुपयांच्या लेव्हलवर सपोर्ट आहे. मात्र काही स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी नजीकच्या काळातील हा शेअर २२ रुपयांची टार्गेट प्राईसपर्यंत पोहोचू शकतो असं म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.