 
						Tata Power Share Price | गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 1.02 टक्क्यांनी वाढून 362.50 रुपयांवर पोहोचला होता. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,15,911 कोटी रुपये आहे. टाटा पॉवर कंपनी कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 494.85 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 338.40 रुपये होती.
टाटा पॉवर कंपनी शेअरची ट्रेडिंग रेंज
1 जानेवारी 1999 रोजी टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 10.20 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 362.50 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची बुधवारची बंद किंमत 358.85 रुपये होती. गुरुवारी दिवसभरात टाटा पॉवर कंपनी शेअर 355.10 रुपये ते 365.90 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील एक वर्षात हा शेअर 338.40 पैसे ते 494.85 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.
टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला
ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट विश्लेषकांनी टाटा पॉवर शेअरबाबत गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, टाटा पॉवर कंपनी वीजनिर्मिती, पारेषण आणि वितरण अशा प्रत्येक वर्टिकलमध्ये कार्यरत आहे. पॉवर सेक्टरमध्ये कंपनीने स्वतःच स्थान निर्माण केलं आहे आहे.
विश्लेषकांनी पुढे सांगितले की, ‘टाटा पॉवर कंपनी शेअरमध्ये बरीच घसरण झाली आहे. तसेच गुजरातमधील वीज प्रकल्पाबाबत काही त्रुटी आहेत, ज्या दूर करण्यात कंपनी कुठेतरी कमी पडताना दिसतेय. टाटा पॉवर शेअर उच्चांकी पातळीपासून २५ टक्क्यांनी घसरला आहे.
गुंतवणूकदारांनी टाटा पॉवर शेअरबाबत लॉन्ग टर्म दृष्टिकोन ठेवणं गरजेचे आहे. टाटा पॉवर कंपनीला वीज क्षेत्रात लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून भरपूर संधी आहेत. काही दिवसात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याआधी शेअर बाजार तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सबाबत खरेदीचा सल्ला दिला नाही. मात्र, ज्या गुंतवणूकदारांकडे टाटा पॉवर शेअर्स आहेत त्यांना ‘HOLD’ करण्याचा सल्ला दिला आहे.
टाटा पॉवर कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 1.55% घसरला आहे. मागील १ महिन्यात टाटा पॉवर कंपनी शेअर 9.35% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 12.95% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा पॉवर कंपनी शेअरने 4.71 टक्के परतावा दिला आहे. गेल्या ५ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 492.32 टक्के परतावा दिला आहे. मात्र, लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 3,453.92% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर टाटा पॉवर शेअर 7.61% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		