
NBCC Share Price | शुक्रवार, 24 जानेवारी 2025 रोजी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर 0.80 टक्क्यांनी घसरून 91.30 रुपयांवर पोहोचला होता. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 24,692 कोटी रुपये आहे. एनबीसीसी कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 139.83 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 64.33 रुपये होती.
एनबीसीसी लिमिटेड शेअरची ट्रेडिंग रेंज
13 एप्रिल 2012 रोजी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर 4.22 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर 91.44 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची गुरुवारची बंद किंमत 92.04 रुपये होती. शुक्रवारी दिवसभरात हा शेअर 90.74 रुपये ते 93.58 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला दोन नवीन मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. एनबीसीसी इंडिया कंपनीला मिळालेल्या या कॉन्ट्रॅक्टची किंमत २२९.७५ कोटी रुपये आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून पहिला कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. एम्स बिलासपूरसाठी मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टची किंमत १४८.४ कोटी रुपये आहे. तर विशाखापट्टणम येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटकडून मिळालेल्या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टची किंमत 81.35 कोटी रुपये आहे.
एनबीसीसी कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात एनबीएफसी कंपनी शेअर 6.85% घसरला आहे. मागील १ महिन्यात एनबीसीसी कंपनी शेअर 2.27% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 24.58% घसरला आहे. मागील १ वर्षात एनबीसीसी कंपनी शेअरने 29.80 टक्के परतावा दिला आहे. गेल्या ५ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 264.76 टक्के परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 2,058.29% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर एनबीसीसी शेअर 2.01% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.