 
						Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडातील गुंतवणूक झपाट्याने वाढत चालली आहे. आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपी करून लाखो रुपयांची रक्कम कमावली आहे. म्युच्युअल फंड योजनांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकाळात मोठा परतावा मिळवू शकता.
चांगली रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करणे गरजेचे आहे त्यामुळे लवकरात लवकर म्हणजेच कमी वयातच गुंतवणुकीस सुरुवात करणे फायद्याचे ठरेल. तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेमध्ये 100 रुपयांची एसआयपी करून देखील दीर्घकाळात मोठा फंड तयार करू शकता.
SIP गुंतवणुकीचे फायदे :
म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून लगातार गुंतवणूक केली जाते. गुंतवणुकीमध्ये सातत्य असल्याकारणाने बाजारातील चढ उतारांचा वाईट परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर होताना पाहायला मिळत नाही. एसआयपी वार्षिक आधारावर 12% दराने व्याजदर देते. त्यामुळे दीर्घकाळात पैशांची गुंतवणूक करून आणि मिळालेले व्याज पुन्हा गुंतवून तुम्ही मोठ्या काळामध्ये कंपाऊंड इन तसेच चक्रवाढ व्याजाचा लाभ घेऊ शकता.
गुंतवणूक केवळ 100 रुपयांची :
ज्या व्यक्तींना छोट्यातली छोटी रक्कम गुंतवून दीर्घकाळात मोठा फंड तयार करण्याचा विचार करायचा आहे त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड एसआयपी हा गुंतवणुकीचा पर्याय अतिशय फायद्याचा ठरू शकतो. एसआयपीची गुंतवणूक तुम्हाला वार्षिक आधारावर दहा टक्के ते पंधरा टक्के दरापर्यंत व्याजदर देते. अशातच तुम्ही प्रत्येक महिन्याला 100 रुपयांची मासिक एसआयपी करत असाल तर, 20 वर्षांच्या कालावधीत 12% व्याजदराने गुंतवणूकदाराच्या खात्यात 99,914.79 रुपयांची रक्कम जमा होते.
100 रुपयांच्या गुंतवणुकीतून 10, 20, 30 आणि 40 वर्षांमध्ये किती फंड तयार होऊ शकतो जाणून घ्या : 
1. प्रत्येक दिवसाला 100 रुपये वाचवले तर महिन्याला 3000 रुपयांची रक्कम जमा होते. 10 वर्षांचे कॅल्क्युलेशन सांगायचे झाल्यास तुमच्या खात्यात 6,97,017 रुपये जमा होतील. यामध्ये 3,60,000 तुमची गुंतवणुकीची रक्कम असेल आणि 3,37,017 एवढे पैसे व्याजाने मिळालेले असतील.
2. 20 वर्षांच्या कालावधीत प्रत्येक दिवसाला 100 रुपये वाचवून आणि गुंतवून त्याचबरोबर व्याजदराचा फायदा मिळून गुंतवणूकदाराच्या खात्यात 29,97,444 रुपयांची रक्कम तयार होईल.
3. 30 वर्षांच्या कालावधीत प्रत्येक दिवसाला 100 रुपये वाचवून आणि गुंतवणूक करून व्याजदराचा लाभ मिळवून गुंतवणूकदाराच्या खात्यामध्ये 1,05,89,741 रुपयांची रक्कम तयार होईल.
4. 40 वर्षांच्या कालावधीत प्रत्येक दिवसाला 100 रुपये वाचवले आणि व्याजदरानुसार कॅल्क्युलेशन बघितले तर, गुंतवणूकदाराच्या खात्यामध्ये 3,56,47,261 रुपये जमा होतील.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		