3 May 2025 7:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Post Office MIS | पत्नीबरोबर 'या' खात्यामध्ये पैसे गुंतवल्यास 10,000 रुपयांची रक्कम केवळ व्याजाने कमवाल, संपूर्ण डिटेल्स वाचा

Post Office MIS

Post Office MIS | तुम्ही ही म्हण बऱ्याचदा ऐकली असेल की, ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो’ याच म्हणीप्रमाणे पुरुषांना आणि महिलांना फायदा मिळवून देणारी पोस्टाची योजना ठरली आहे. पैशांची बचत करून आर्थिकदृष्ट्या प्रगती करण्यासाठी दोघांनी देखील समयोगदान दिले पाहिजे. तरच भविष्यामध्ये आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागणार नाही.

आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या एका अशा योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या पत्नीबरोबर पैसे गुंतवले तर, तब्बल 10,000 रुपयांची रक्कम केवळ व्याजाने मिळेल. महत्त्वाचं म्हणजे हे व्याज तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळेल. चला तर जाणून घेऊया योजनेविषयीची संपूर्ण माहिती.

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम :
पती-पत्नीला बंपर परतावा मिळवून देणारी पोस्टाची मंथली इन्कम स्कीम ही योजना तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम मिळवून देऊ शकते. पोस्टाच्या मंथली इन्कम स्कीमवर सध्या 7.4% दराने व्याज मिळते. त्याचबरोबर तुम्ही केवळ 1000 रुपयांची रक्कम गुंतवून पोस्टामध्ये खाते उघडू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीबरोबर खाते उघडले असेल तर, 15 लाख रुपयांची रक्कम गुंतवण्याची मर्यादा आहे. त्याचबरोबर एकल खातं उघडायचं असल्यास 9 लाखांची रक्कम गुंतवावी लागेल.

पत्नीसह खाते उघडून मिळणार बंपर फायदा :
तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला दुप्पटीने लाभ कमवायचा असेल तर दोघांनाही संयुक्त खाते म्हणजे तो जॉईंट अकाउंट उघडावे लागेल. या संयुक्त खात्यामध्ये तुम्हाला 15 लाखांची रक्कम गुंतवावी लागेल. पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 9250 रुपयांची रक्कम मिळणे सुरू होईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पोस्टाच्या मंथली इनकम योजनेत 3 प्रौढ व्यक्तींचे खाते देखील उघडू शकता.

योजनेचा परिपक्व काळ :
पोस्टाची मंथली इन्कम योजना 5 वर्षांमध्ये परिपक्व होते. योजनेला एकूण 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खाते बंद करण्यासाठी तुम्हाला आणखीन एक फॉर्म भरावा लागेल आणि पासबुकची प्रत जोडून बँक शाखेत जमा करावे लागेल. पोस्टाची योजना सुरू झाल्यानंतर एका वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला एक रुपया देखील काढता येत नाही. परंतु 3 वर्षांच्या आत पैसे काढण्याची मुभा दिली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे या पैशांवर 2% व्याज वजा देखील केले जाते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post Office MIS(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या