
Post Office Scheme | प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय हवा असतो. तसं पाहायला गेलं तर सुरक्षित गुंतवणुकीसाठी बहुतांश भारतीय नागरिक पोस्ट ऑफिसच्या योजनांवर विश्वास ठेवत आहेत. बाजारात इतरही योजना आहेत काही म्युच्युअल फंड आहेत. परंतु या शेअर बाजारातील स्टॉक्समध्ये आणि शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याची जोखीम सर्व सामान्य व्यक्तींना उचलायची नाही. एका सर्वसामान्य कुटुंबीयातील व्यक्तीचे माइंडसेट असे असते की, आपण गुंतवलेले पैसे हे आपल्याला व्याजासकट आणि तेही निश्चित स्वरूपात मिळावे.
याच कारणांमुळे बहुतेक सर्वसामान्य नागरिक आपल्याला निश्चित स्वरूपात पैसे मिळावे हा उद्देश लक्षात ठेवून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास काढता पाय घेतात. आज आपण पोस्टाच्या पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड या योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. योजनेमध्ये तुम्ही चक्क 70 रुपयांची बचत करून 6 लाख रुपयांचा मोठा फंड तयार करू शकता. आज या पीपीएफ गुंतवणुकी बाबतचे संपूर्ण कॅल्क्युलेशन आपण जाणून घेणार आहोत.
पीपीएफ पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना कशी कार्य करते :
1. गुंतवणुकीचे प्रकार आहेत. एक म्हणजे कमी कालावधीसाठी गुंतवलेले पैसे आणि दुसरे म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक. ज्या व्यक्तींना दीर्घकाळातून मोठा निधी तयार करून ठेवायचा आहे त्यांच्यासाठी पोस्टाची पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
2. पोस्टाच्या पीपीएफ योजनेमध्ये तुम्ही वार्षिक आधारावर कमीत कमी 500 तर, जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची रक्कम गुंतवू शकता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेचे खाते कोणत्याही बँकेमध्ये उघडू शकता.
3. याचाच अर्थ तुम्ही या योजनेत एका वर्षात 1.5 लाखांची रक्कम गुंतवू शकता. प्रत्येक वर्षाला 1.5 लाखांपर्यंत रक्कम गुंतवून तुम्ही 15 वर्षांमध्ये मोठा फंड तयार करू शकता. योजनेचा कार्यकाळ 15 वर्षांचा दिला गेला आहे.
4. पोस्टाची पीपीएफ योजना सध्याच्या घडीला 7.10% दराने व्याजदर देत आहे. आज आपण पोस्टाच्या पीपीएफ योजनेत 70 रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर मॅच्युरिटी काळापर्यंत म्हणजेच 15 वर्षानंतर किती रुपयांचा निधी तयार होईल याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
70 रुपयांची बचत करून लाखोंच्या घरात पैसे कमवाल :
समजा तुम्ही दिवसाला 70 रुपये वाचवत असाल तर, एका वर्षातच तुमच्या खात्यात 25,000 रुपयांची रक्कम गुंतवली जाईल. प्रत्येक वर्षाला 25,000 रुपयांची रक्कम गुंतवून तुम्ही पुढील 15 वर्षांत 3 लाख 75 हजार रुपये गुंतवता या गुंतवलेल्या रक्कमेवर 7.10% दराने 6 लाख 78 हजार 35 रुपये मिळवू शकता. म्हणजेच योजनेतून मिळालेले व्याज हे 3 लाख 3 हजार 35 रुपये असेल.