20 May 2024 2:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

सरकारी कंपनी एअर इंडियाकडे इंधन पुरवठादारांची आधीची देणी देण्यास पैसे नाहीत

Air India, Oil Providers

नवी दिल्ली : आधीची देणी न चुकविल्याने पुण्यासहित सहा विमानतळांवरएअर इंडियाच्या विमानांना इंधन पुरवठा करणे तेल कंपन्यांनी बंद केले आहे. मात्र त्यामुळे एअर इंडियाच्या सेवेवर त्याचा अद्याप फारसा परिणाम झालेला नाही. कोची, पुणे, पाटणा, रांची, विशाखापट्टणम आणि मोहाली या विमानतळांवरून एअर इंडियाल होणारा इंधन पुरवठा बंद करण्यात आला आहे.

या विमानतळांवरून इंधन मिळणे बंद झाल्याने आता एअर इंडियाच्या विमानांना इतर ठिकाणांहून अतिरिक्त इंधन भरून या विमानतळांवर प्रवास करावा लागणार आहे. त्यातच अतिरिक्त इंधनामुळे विमानाचे वजन वाढणार असल्याने प्रवाशांची संख्या कमी करावी लागणार आहे. अर इंडियाचे प्रवक्त्याने सांगितले की, आर्थिक मदतीशिवाय एअर इंडिया मोठ्या प्रमाणावरील कर्जाचे उत्तरदायित्व हाताळू शकत नाही. मात्र, तरीही एक आशादायी चित्र असे आहे की, या अर्थिक वर्षातील आमची आर्थिक कामगिरी ही खूपच चांगली राहिली आहे. कंपनी आता फायद्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

दरम्यान, गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास विविध राज्यांतील तेल कंपन्यांनी देशातील सहा विमानतळांवरील एअर इंडियाच्या विमानांसाठीचा इंधन पुरवठा थांबवला. यामध्ये कोचीन, विशाखापट्टणम, मोहाली, रांची आणि पुणे या विमानतळांचा समावेश आहे. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे. एअर इंडियावर सध्या सुमारे ४८,००० कोटींचे कर्ज आहे. गेल्या वर्षी सरकारने एअर इंडियातील ७६ टक्के भाग-भांडवल निर्गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. मात्र, ही भाग-भांडवल विक्री प्रक्रिया अपयशी ठरली होती. एअर इंडियाने आतापर्यंत ६० कोटी रुपये चुकते केले आहेत. ही मागील थकबाकी होती.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x