2 May 2025 8:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

पीएमसी बँकेविरोधात सखोल चौकशीसाठी किरीट सोमय्यांची आरबीआय'कडे तक्रार

PMC Bank, Kirit Somaiya, RBI, Punjab and Maharashtra Co Operative Bank

मुंबई: महाराष्ट्रासह अन्य ७ राज्यांमध्ये मिळून १३७ शाखा असलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून, त्यामुळे काही लाख खातेदारांवर संकट कोसळले होते. आरबीआयने या बँकेतून खातेधारकांना केवळ एक हजार रुपयेच काढण्याची मुभा दिली होती.

बँकिंग नियमन कायदा ’३५ अ’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पीएमसी बँकेवर नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. तसेच निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रुपयेच काढता येतील. रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, तसेच नव्या ठेवी स्वीकारू नयेत, किंवा बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करू नयेत, अशाप्रकारचे निर्बंध बँकेवर असतील असं आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, आरबीआयने पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचे सर्व व्यवहार सहा महिन्यांसाठी थांबवले असल्याचे सांगण्यात आलं आहे. काल सकाळी बँकेमार्फत ग्राहकांना याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे चिंतीत झालेले ग्राहक बँकेत मोठ्या संख्येने जमले असून, आजही अनेक शाखांमध्ये तीच परिस्थिती आहे.

थकीत कर्जांसंबंधी चुकीची माहिती देणे आणि कर्जवाटपातील गैरव्यवहार यांमुळे हे निर्बंध आणण्यात आले आहेत. मात्र, खातेधारकांची अडचण ओळखून आरबीआयने १ हजार रुपयेच काढण्याची मुभा वाढविली असून १० हजार रुपये करण्यात आली आहे. यामुळे ज्या खातेधारकांनी एक हजार रुपये काढले आहेत त्यांना ६ महिन्यात आणखी ९ हजार रुपये काढता येणार आहेत.

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेविरोधात अनेक ठेवीदारांनी बँक व्यवस्थापकाविरोधात तक्रार केलेली असताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही पीएमसी बँकेविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी विनंती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) यांच्याकडे केली आहे.

किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखा (EOW) यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. पीएमसी बँकेतील ९.१२ लाख ठेवीदारांचा पैसा बँकेतील टॉप मॅनेजमेंटमधील अधिकाऱ्यांनी आणि इस्टेट फर्म एचडीआयएल यांनी लूटला आहे, असे सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांकडे तक्रार करतानाच सोमय्या यांनी आरबीआयलाही पीएमसी बँकेविरोधात कारवाई करण्यासंबंधी एक पत्र पाठवून विनंती केली आहे. एचडीआयएल कंपनी आणि पीएमसी बँक यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असे म्हटले आहे. राज्यपाल शक्तिकांत दास यांनाही तक्रार केल्यासंबंधीची प्रत पाठवण्यात आली आहे. दरम्यान, पीएमसी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एचडीआयएल ग्रुप मालकाच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Banks(57)#KiritSomaiya(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या