2 May 2024 10:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
x

वंचित'मुळे आघाडीच्या ३२ जागा पडल्या; बाळासाहेब थोरातांची देखील टीका

VBA, Vanchit Bahujan Aghadi, Prakash Ambedkar, NCP, Congress, Balasaheb Thorat

मुंबईः लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस-एनसीपीच्या आघाडीला बसला आहे. राज्यातील २८८ मतदारसंघापैकी ३२ जागांवर वंचितमुळे काँग्रेस एनसीपीचे उमेदवार पडल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस-एनसीपीला अपेक्षित यश मिळाले असले तरी ३२ जागांवर काँग्रेस-एनसीपी उमेदवार अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने राज्यातील विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती केली नव्हती. लोकसभेत सोबत असलेला खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमसोबतही आंबेडकर यांनी ऐनवेळी युती तोडली. त्यामुळे राज्यातील २८८ मतदारसंघात वंचितने उमेदवार उभे केले होते. भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा वंचितवर आधीपासूनच आरोप केला जात आहे. परंतु, हा आरोप वंचितच्या नेत्यांनी फेटाळून लावला आहे. विधानसभा निवडणुकीत चांगल यश मिळवलेल्या काँग्रेस – एनसीपी आघाडीसोबत वंचितची आघाडी झाली असती तर राज्यातील चित्र आणखी वेगळे दिसले असते असे निवडणूक निकालावरून आता स्पष्ट झाले आहे.

राज्यातील जवळपास ३२ जागांवर काँग्रेस एनसीपीचे उमेदवार अगदी ५ ते १० हजार मतांच्या फरकाने पडले आहेत. तर त्याच मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी १० हजारांहून अधिक मते घेतली आहेत. वंचितला मिळणारी ही सर्व मते काँग्रेस एनसीपीला मिळणारी मते असल्याचे बोलले जात आहे. वंचितने काँग्रेस एनसीपीसोबत आघाडी केली असती तर राज्यात आघाडीला सव्वाशे पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या, हे आता निवडणूक निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, सत्ताधाऱ्यांना वंचित आघाडीला पुढे करून जे काही करायचं होतं, ते करण्यात त्यांना यश आलं आहे,’ असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नसल्याचं या निकालातून स्पष्ट झालं. त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेसला आणखी मोठ्या पराभवाचा धक्का सहन करावा लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र काँग्रेसलाही समाधानकारक जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासह सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-सेनेवर निशाणा साधला आहे.

‘महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव झाला नाही. काश्मीरमधील कलम ३७० यासारखे भावनिक मुद्दे चालले नाहीत. जनतेच्या समस्या सत्ताधारी भूमिका मांडण्यात कमी पडले. म्हणूनच त्यांच्या जागा घटल्या,’ अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x