14 May 2025 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टीबैगर शेअरमध्ये तेजीचे संकेत, अपसाइड टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RVNL IRFC Share Price | 22 टक्के तेजीचे संकेत, पीएसयू शेअर्सची जोरदार खरेदी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Yes Bank Share Price | येस बँक शेअर्ससाठी SELL रेटिंग, पेनी स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत - NSE: YESBANK HFCL Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार या स्वस्त शेअरवर, रिलायन्स ग्रुपचीही हिस्सेदारी, टार्गेट नोट करा - NSE: HFCL Tata Steel Share Price | ग्लोबल नुवामा फर्मकडून BUY रेटिंग, टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATASTEEL Tata Motors Share Price | बोफा सिक्युरिटीज बुलिश, टार्गेट प्राईस वाढवली, फायद्याची अपडेट आली - NSE: TATAMOTORS JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER
x

फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड

CM devendra Fadnavis, BJP Meet

मुंबई: देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय निरिक्षक नरेंद्र सिंह तोमर, सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे, राधाकृष्ण विखे, गणेश नाईक, संजय कुटे, देवयानी फरांदे, देवराव भोईर, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले यांनी अनुमोदन दिले. याद्वारे आता भारतीय जनता पक्षाकडून फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आले आहे.

या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, नरेंद्रसिंह तोमर आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश खन्ना उपस्थित आहेत. या बैठकीत नव्याने निवडून आलेल्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. भारतीय जनता पक्षाची ही बैठक केवळ औपचारिकता म्हणून घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच विधिमंडळ नेतेपदी पुन्हा एकदा निवड होण्याचं निश्चित होतं. आजची ही बैठक भारतीय जनता पक्षानं सत्तास्थापनेसाठी पहिलं पाऊल उचलल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी आपली जडण-घडण, गेल्या ५ वर्षात जे काम केलं त्यापेक्षा चांगलं काम पुढील ५ वर्षात करायचं आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. महायुती म्हणून आपण निवडणूक लढलो, जनतेने महायुतीला कौल दिला, राज्यात महायुतीचंच सरकार स्थापन होणार आहे. कोणत्या अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. उत्तम सरकार पुन्हा स्थापन होईल, असं देखील फडणवीस म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या