5 May 2024 12:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
x

विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर आणखी महाग

Gas Price, LPG Price, Gas Cylinder Price Hike

नवी दिल्ली: सिलिडरच्या दरात सलग तिसऱ्या महिन्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेल विपणन कंपन्यांनी सलग तिसऱ्या महिन्यात एलपीजीच्या किंमतीत वाढ केली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननुसार विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ७७ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता दिल्लीत १४.२ किलोग्रॅमच्या विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी आता ६८१.५० रूपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबईत १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी ६५१ रूपये मोजावे लागणार आहेत.

तर दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (१९ किलो) दरातही मोठी वाढ करण्यात आली आहे. यामध्ये ११९ रूपयांची वाढ करण्यात आली असून आता दिल्लीत १९ किलोच्या सिलिंडरसाठी दिल्लीत १ हजार २०४ रूपये मोजावे लागणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात १९ किलोच्या सिलिंडरसाठी १ हजार ८५ रूपये मोजावे लागत होते. याव्यतिरिक्त पाच किलोच्या सिलिंडरच्या दरातही लाढ करण्यात आली असून ते आता २६४.५० रूपयांना मिळणार आहे. आजपासूनच हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.

विनाअनुदानित सिलिंडर दरवाढी आधी ६३९.५० रुपयांना मिळत होतं. तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (१९ किलो) दरातही ११९ रुपयातही वाढ झाली आहे. दुकानदारांना हे व्यावसायिक सिलिंडर हे १२८८ रुपयांना पडेल. हे सिलिंडर आधी दुकानदारांना ११६९ रुपयांना मिळत होतं. तर पाच किलोच्या छोट्या सिलिंडरचे दरही २६४.५० रुपयांपर्यंत वाढले आहेत. वाढलेले दर आज सकाळपासून लागू झाले आहेत.

सप्टेंबरमध्ये दिल्लीत १४.२ किलो विनाअनुदानित सिलिंडर ५९० रुपये होता. कोलकात्यात याच सिलिंडरचा दर ६१६.५० रुपये होता. तर मुंबई आणि चेन्नईत १४.२ किलो विनाअनुदानित सिलिंडरचा दर क्रमशः ५६२ आणि ६०६.५० रुपये होता. तसेच १९ किलोग्रामच्या दिल्लीतल्या सिलिंडरची किंमत १०५४.५० रुपये होती. कोलकात्यात गेल्या महिन्यात १११४.५० रुपये, मुंबईत १००८.५० रुपये आणि चेन्नईत ११७४.५० रुपये दर होता.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या तीन महिन्यांपासून सतत वाढ होतेय. गेल्या तीन महिन्यांत विनाअनुदानीत घरगुती गॅस सिलिंडरच्या बाजार भावात एकूण १०५ रुपयांनी वाढ झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये हे सिलिंडर ६११ रुपयांना मिळत होतं. तर व्यावसायिक सिलिंडरचे दर १९३ रुपयांनी वाढले आहेत. हे सिलिंडर तीन महिन्यांपूर्वी १०९५ रुपयांना दुकानदारांना मिळत होतं.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x