इंदूर: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने (Indian Cricket Team) पहिल्या डावात ३४३ धावांची विजयी अशी आघाडी घेतली होती. या डोंगरा ऐवढ्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा (Bangladesh Cricket Team) दुसरा डाव २१३ धावात संपुष्ठात आला. तिसऱ्या दिवशी सकाळी भारताने पहिला डाव घोषित केला. त्यानंतर ३४३ धावांचा डोंगर घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा दुसरा डाव देखील कोसळला. पहिल्या डावा प्रमाणे दुसऱ्या डावात देखील मुस्ताफिझूर रेहमान (६४) वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. या विजयासह भारताने कसोटीमध्ये घरच्या मैदानावर सलग १३व्या विजयाची नोंद केली आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

त्याआधी दुसऱ्या दिवशी मयांक अग्रवालचे अडीचशतक अवघ्या काही धावांनी हुकले. १ बाद ८६ या धावसंख्येवरून आज भारताने डावाला सुरूवात केली होती. त्यानंतर मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जाडेजा यांच्या दमदार खेळीच्या बळावर भारताने ४९३ धावा केल्या आणि दिवसाचा खेळ संपल्यानंतर कर्णधार विराटने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशपुढे ३४३ धावांचे आव्हान ठेवले.

रोहित शर्माने (Hitman Rohit Sharma) १७व्या षटकात रहीमला जीवदान दिले होते. त्यावेळी रहीम (Rahim) हा फक्त चार धावांवर होता. मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) गोलंदाजीवर रोहितने रहीमचा सोपा झेल सोडला होता. त्यावेळी रोहित दुसऱ्या स्लीपमध्ये होता. या जीवदानाचचा पुरेपूर फायद रहीमने उचलल्याचे पाहायला मिळाले. या जीवदानानंतर रहीम स्थिरस्थावर झाला आणि त्याने त्यानंतर संयमी फलंदाजी केली. दोन अंकी धावसंख्या उभारत रहीमने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आता रहीमने आपल्या नावावर केला आहे.

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

इंदूर कसोटी: भारताचा बांगलादेशवर डाव आणि १३० धावांनी दणदणीत विजय