14 May 2024 10:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

महापुरुषांचे मोठे पुतळे उभारण्याऐवजी शाळा आणि महाविद्यालये उभारणे गरजेचे: रघुराम राजन

Former RBI Governor Raghuram Rajan, PM Narendra Modi

नवी दिल्ली : सर्वच अधिकार पंतप्रधान कार्यालयात एकवटल्याने इतर मंत्र्यांकडे अधिकार नाहीत त्यामळे भारतीय अर्थव्यवस्था मंदीने बेजार झाली असून नजिकच्या काळात ती आणखी खोलात जाईल, अशी भीती रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी राजन यांनी काही सूचना केल्या आहेत. भांडवली बाजार आणि गुंतवणूक, जमीन, कामगार कायदा या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज राजन यांनी व्यक्त केली होती.

हिंदू राष्ट्रवाद फक्त सामाजिक तणाव वाढवणार नाही, तर भारताला आर्थिक विकासाच्या मार्गावरुन भरकटवण्याचं काम करेल असं मत रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. इंडिया टुडे मॅगजिनमध्ये लिहिलेल्या ‘How to fix the economy’ या लेखात रघुराम राजन यांनी आपलं परखड मत मांडलं आहे.

“भारताच्या आर्थिक विकासाला आहोटी लागली असून, अर्थव्यवस्थेत आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. अशा अवस्थेत पंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण आणि अधिकारहीन मंत्री ही स्थिती अर्थव्यवस्थेसाठी अपायकारक आहे,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी सरकारच्या सामाजिक-राजकीय अजेंठ्यावर टीका करताना रघुराम राजन यांनी सांगितले की, ” राष्ट्रीय किंवा धार्मिक महापुरुषांचे मोठे मोठे पुतळे उभारण्याऐवजी भारताला जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालये उभारणे गरजेचे आहे. ज्यामुळे येथील मुलांचा मानसिक विकास होईल. ते जास्त सहिष्णु आणि एकमेकांशी सन्मानाने वागायला शिकतील. यामुळे ही मुलं भविष्यातील स्पर्धात्मक जगात आपली जागा निर्माण करण्यात यशस्वी होतील.”

सरकारी यंत्रणांच्या दुरुपयोग होत असल्यावरून सुद्धा रघुराम राजन यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. सरकार आपल्याच अधिकारांना कमकुवत करत आहे. कारण, त्यांना भविष्यातील सरकारद्वारे अशाच कारवाईची भीती वाटेल, असे राघुराम राजन यांनी म्हटले आहे.

 

RBI Former Governor Raghuram Rajan Slams PM Narendra Modi over Indian Economy How to Fix the Economy Issues

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x