4 May 2024 11:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मनसेच्या व्यासपीठावर वीर सावरकरांची प्रतिमा; राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका मांडणार?

Veer Savarkar, MNS Maha Adhiveshan, Raj Thackeray, Amit Thackeray

मुंबई : राज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलंच महाअधिवेशन २३ जानेवारीला म्हणजे आज बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या महाअधिवेशनाची तयारी सुरु होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत येत आहेत. मुंबईतील गोरेगाव इथल्या एग्जिबिशन सेंटर इथे सकाळी ९ वाजता या अधिवेशनाला सुरुवात होईल. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आणि अजेंडा बदलण्याच्या तयारीत असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या नव्या झेंड्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यातील मफलरचा रंग देखील बदलणार आहे. कार्यकर्त्यांच्या गळ्यात भगव्या रंगाचा मफलर दिसणार आहे. काल बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जोगेश्वरी येथील जय जवान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांना उद्या झेंड्यासोबत हा मफलरही बदलणार असे सांगितले.

दरम्यान, आज मनसेच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासोबत स्वातंत्रवीर सावरकर यांचा फोटो देखील ठेवण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून देशभरात सावरकरांच्या नावाने मोठं राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावरून शिवसेना देखील कोंडीत सापडल्याचे पाहायला मिळले होते. विशेष म्हणजे काँग्रेसने तर सावरकरांना भारतरत्न दिल्यास आम्ही थेट सत्तेचा देखील त्याग करू, अशी टोकाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेना राज्यात सावरकरांना भारतरत्न देण्यावरून भाजपच्या अजेंड्यावर गेल्यास राज्यात काँग्रेस कोणताही निर्णय घेऊ शकतं अशी शक्यता अधिक आहे.

मात्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरून देशभरात राजकारण तापलं तरी मनसे अध्यक्ष पूर्वीपासूनच स्वातंत्रवीर सावरकरांची उदाहरणं सभेतील भाषणात मांडण्यात आली आहेत. त्यामुळे स्वातंत्रवीर सावरकरांच्या प्रत्येक जयंतीला त्यांच्या फेसबुक अधिकृत पेजवरून अभिवादन करत आले आहेत. वाचनाची प्रचंड आवड असल्याने राज यांनी स्वतः स्वातंत्रवीर सावरकरांची पुस्तकं वाचली आहेत आणि त्यामुळे त्यावर देखील आज विचार मांडतील अशी शक्यता आहे असं आजच्या व्यासपीठावरील फोटोवरून दिसत आहे.

 

Web Title:  MNS Party Maha Adhiveshan Raj Thackeray may talk on Veer Savarkar today.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x