6 May 2024 1:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

शॅडो कॅबिनेट: मनसेचे नेते ठेवणार राज्य सरकारच्या कारभारावर नजर

MNS Shadow Cabinet

मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते शिरीष सावंत यांनी दिली.

राज्य सरकारवर वचक ठेवण्यासाठी पक्षातील प्रत्येक नेता आणि सरचिटणीस यांना संबंधित खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. एखाद्या मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा मनसे नेते पाठपुरावा करतील. हे सर्व नेते पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना मंत्र्याचं रिपोर्ट कार्ड देतील.राज्य सरकारच्या कामावर नजर ठेवण्याचं काम शॅडो कॅबिनेटद्वारे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शॅडो कॅबिनेट राज्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या कामावर लक्ष ठेवणार आहे. तसंच गैरव्यवहार होत असल्याचं त्याचा अहवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहे.

यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश अभ्यंकर, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, जयप्रकाश बाविस्कर अशा नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या मंत्र्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यानी कोणताही गैरव्यवहार केला तर त्याचा पाठपुरावा केला जाईल त्यानंतर याचा संपूर्ण अहवाल पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल.

 

Web Title:  MNS party Shadow cabinet to keep readers ministers in Maha Vikas Aghadi.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x