पुढे जावून पावले मागे वळतात
क्षणात नजरा कासावीसच होतात
मनातच काहीतरी खूप खदखदत
काहीतरी चुकल्या सारखच वाटत
काय चुकलंय कळत नसत
का लहरी मन बेचैन असत
काय चाललंय लक्षात नसत
शून्यातच कुठेतरी मन असत
मनात विचारांची घालमेल अन
चटकन शंकेची मनात चूक-चुकते
काही बर वाईट तर नसेल ना
मनच मनाची समजूत घालते
काहीतरी चुकतंय पण काय
सगळं निट सुरळीत सुरु असतांना
मन कशात तरी राहिलंय हरवलंय
आयुष्याची पहिली सुरुवात असतांना
लेखक: पियुष खांडेकर
