8 May 2025 4:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

देशात मागील २४ तासांत सर्वाधिक १९५ मृत्यू; ३९०० नवे कोरोना रुग्ण

Lockdown, Corona Crisis, Covid 19

नवी दिल्ली, ५ मे: देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३९०० नवे रुग्ण आढळले आहेत. तर १९५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि आणि मृत्यू झालेलांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

यातील जवळपास १२,७२७ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय तर १५६८ जणांचा यात बळी गेला आहे. गेल्या २४ तासांत जवळपास ३९०० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले तर १९५ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय. सध्या ३२,१३८ जणांवर देशातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, गोवा, लडाख, मणिपूर, मिझोरम, पुदुच्चेरी, त्रिपुरा, उत्तराखंड या राज्य / केंद्रशासित प्रदेशांत करोनामुळे अद्याप एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, हे विशेष.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात खबरदारीचे सगळे उपाय योजले जात आहेत. लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला असला तरीही सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहनही करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाउन वाढवण्यात आल्याची घोषणा केली आहे. आणखी दोन आठवडे म्हणजेच १७ मेपर्यंत देशभरात लॉकडाउन कायम असणार आहे. त्यानंतर काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणा आहे.

 

News English Summary: In the last 24 hours, 3900 new patients of Corona have been found in the country. 195 people have died. This is the highest number of new corona patients and deaths ever, according to the health ministry.

News English Title: Story corona virus highest count of 3900 new covid 19 patients in the last 24 hours in the India News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या