2 May 2024 7:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

शरद पवारांकडून मुंबईतील एमएमआरडीए मैदानातील क्वारंटाईन केंद्राची पाहणी

Sharad Pawar, MMRDA, Corona Quarantine Center

मुंबई, १५ मे: देशभरात कोरोना विषाणूने घातलेलं थैमान पाहता आता, संपूर्ण देश हा लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सध्या सुरु असणारा टाळेबंदीचा तिसरा टप्पा हा अवघ्या काही दिवसांतच संपून औपचारिकरित्या देश या नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. १८ मे पासून सुरु होणारा चौथा लॉकडाऊन हा काही अंशी वेगळ्या स्वरुपाचा असेल.

दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांना लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याविषयीच्या प्रश्नाचंही उत्तर दिलं. या टप्प्यात ग्रीन झोन पूर्णपणे सुरु राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, ऑरेंज झोनमध्येसुद्धा कंटेन्मेंट क्षेत्र वगळता इतर भाग हा सुरु केला जाऊ शकतो. राज्यात अनेक जिल्हे आणि गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळलेले नाहीत. त्यामुळे या भागांमध्ये बऱ्याच अंशी लॉकडाऊनला शिथिलता दिली जाऊ शकते असं ते म्हणाले.

दरम्यान, मुंबईतील एमएमआरडीए मैदानात अलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा उपलब्ध करण्यात येत असून शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भेट देत पाहणी केली. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा वाढता आलेख आणि मुंबईतील हॉटस्पॉट झोनची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन कालावधीत तब्बल ५० दिवस घरी असणारे शरद पवार आज मैदानात उतरल्याचं दिसून आलं. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी क्वारंटाईन सुविधांची पाहणी केली.

 

News English Summary: A quarantine facility is being provided at the MMRDA ground in Mumbai and on Friday, NCP President MP Sharad Pawar visited and inspected it.

News English Title: NCP President Sharad Pawar visited Mumbai MMRDA corona quarantine care center News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x