8 May 2024 10:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

JEE-NEET परीक्षा घेण्यासाठी आमच्यावर पालक आणि विद्यार्थ्यांचा दबाव होता - केंद्रीय शिक्षणमंत्री

Coronavirus, Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank, NEET JEE Exams

नवी दिल्ली, २६ ऑगस्ट : महाराष्ट्र सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या MHCET अर्थात अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर MHCET परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयानं त्यावरून याचिकाकर्त्यांना फटकारत मागणी फेटाळून लावली आहे.

राज्यात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात येणारी अभियांभिकी प्रवेश पूर्व परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

तसेच कोरोना संकटामुळे नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलली जावी अशी मागणी वारंवार केली जात आहे. केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीतही न्यायालयाने परीक्षा घेतली पाहिजे असा निर्वाळा दिला आहे. यादरम्यान स्वीडनची १७ वर्षीय पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्गने परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. करोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगणं अन्यायकारक असल्याचं ग्रेटा थनबर्गने म्हटलं आहे. तिने ट्विट करत आपलं मत मांडलं आहे. ग्रेटा थनबर्गने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “भारतातील विद्यार्थ्यांना करोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसण्यची सक्ती करणं अन्यायकारक आहे. जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीचं मी समर्थन करते” असं तिने म्हटलं आहे.

दरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सतत विद्यार्थी आणि पालकांकडून दबाव असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. जेईई परीक्षा देणाऱ्या ८० टक्के उमेदवारांनी अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड केले असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे. “जेईई आणि नीट परीक्षेसाठी परवानगी का देत नाही यासाठी आम्ही सतत पालक आणि विद्यार्थ्यांच्या दबावात होतो. विद्यार्थ्यांना काळजी लागली होती. आपण अजून किती काळ अभ्यास करायचा ही चिंता त्यांना सतावत होती,” असं त्यांनी सांगितलं आहे.

“जेईई परीक्षेसाठी साडे आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामधील सात लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड केलं आहे. आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. शिक्षण नाही तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य आहे,” असं रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं आहे,

 

News English Summary: NEET, JEE Main 2020 examination will be conducted in September as per the schedule. Education Minister Ramesh Pokhriyal Nishank has finally come ahead to talk about how the center took the decision to conduct the examination amid this pandemic.

News English Title: Coronavirus Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank On NEET JEE Exam News Latest Updates.

हॅशटॅग्स

#JEE Exam 2020(9)#NEET EXAM 2020(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x