6 May 2024 6:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

आपण केलं की पाप आणि त्यांनी केलं की पुण्य | मुख्यमंत्र्यांची मोदी सरकारवर टीका

CM Uddhav Thackeray, Modi Government, 7 states chief ministers meeting

मुंबई, २६ ऑगस्ट : काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस समर्थित सरकारचे मुख्यमंत्री व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलविली. जीएसटी आणि नीट-जेईई परीक्षेबाबत ही बैठक घेण्यात आली.

सोनिया गांधींनी बैठकीत सर्वप्रथम जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, सध्या नीट-जेईई परीक्षा घेणे सुरक्षित नाही. जर केंद्र सरकार प्रयत्न करत नसेल तर सर्व राज्य सरकारांनी सर्वोच्च न्यायालयाकडे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करावी.

सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत कोरोनासह विविध विषयांवर चर्चा झाली. कोरोनाविरुद्ध लढाईची चर्चा होत असताना ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरेंचे खूप कौतुक केले. तुम्ही करोना संसर्गाशी खूपच चांगलंच लढत आहात, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ममता बॅनर्जींनी केलेल्या कौतुकाचे आभार मानत मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच केंद्रातील सत्ताधाऱ्यांविरोधात लढायचं की त्यांना घाबरून राहायचं हे आधी ठरवलं पाहिजे, असं मत उद्धव ठाकरे यांनी या बैठिकित मांडले.

आपण केलं की पाप आणि त्यांनी केलं की पुण्य असा टोला केंद्र सरकारच्या भूमिकेवरुन त्यांनी लगावला. तसंच जनतेचा आवाज कोणी दाबू शकत नाही, आणि जर तो दाबण्याचा प्रयत्न झाला तर तो अजून बुलंद करणं आपलं कर्तव्य आहे असंही यावेळी ते म्हणाले. या बैठकीत काँग्रेसचे चार आणि तर इतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री सहभागी झाले.

 

News English Summary: CM Uddhav Thackeray blamed the central government for the sin that we committed and the virtue that we committed. He also said that no one can suppress the voice of the people, and if there is an attempt to suppress it, it is our duty to make it louder.

News English Title: CM Uddhav Thackeray slams Modi Government during 7 states chief ministers meeting News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x