कर्नाटक : सध्या कर्नाटक निवडणुकीने चांगलाच जोर पकडला असून दोन्ही प्रमुख पक्ष एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली असून आवाहनाला प्रतिआवाहन दिले जात आहे.

दोनच दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी कर्नाटकातील प्रचारा दरम्यान राहुल गांधींवर टीका करताना हातात कागद न घेता १५ मिनिटे सिद्धरामय्या सरकारच्या उपलब्धेतवर बोलण्याचे आव्हान दिल होत. नरेंद्र मोदींच्या त्याच टीकेला आता काँग्रेसकडून सुद्धा जोरदार प्रतिउत्तर मिळालं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग १५ मिनिटे खरे बोलून दाखवण्याचे थेट आव्हान कर्नाटक महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी मोदींना दिले आहे. नरेंद्र मोदींकडे जय शाह, पियूष गोयल आणि राफेल करार सारख्या प्रकरणांवर कोणतेच उत्तर नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ज्या पण भाषेत बोलतील ते सत्यच बोलतील. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना राफेल करारावर बोलण्याबाबत विचारले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी किमान १५ सेकंद तरी भ्रष्टाचार व महिला सुरक्षेवर बोलतील का, असा खडा सवाल सुष्मिता देव यांनी उपस्थित केला आहे.

तसेच नरेंद्र मोदींनी येदियुरप्पा यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील कामगिरीविषयी केवळ १५ मिनिटे बोलण्याचे आव्हान विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले होते. त्यानंतर पुन्हा सुष्मिता देव यांनी सुद्धा नरेंद्र मोदींना थेट आवाहन केल्याचे वृत्त आज तक या वृत्त वाहिनीने दिल आहे.

दरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी कर्नाटक विधानसभेतील प्रचारात चांगलीच रंगत असून येत्या १२ मे रोजी कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर १५ मे रोजी मतमोजणी होत आहे. भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांनी सुद्धा जोमात प्रचार सुरू केला असला तरी खरी लढत काँग्रेस, भाजपा आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यात आहे.

sushmita dev counter pm narendra modi and says if he speaks 15 minutes without telling a lie