29 April 2024 3:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

ST कामगाराची आत्महत्या | अर्नबच्या वकिलांकडून युक्तिवादात मुख्यमंत्र्यांच्या अटकेवरून प्रश्न

Supreme court, Arnab Goswami, interim bail

नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर : इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी अंतरीम जामिनासाठी मंगळवारी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवर आज म्हणजे बुधवारी सुनावणी पार पडत असून न्यायालयात जोरदार युक्तिवाद सुरु झाला आहे. जस्टीस धनंजय चंद्रचूड आणि जस्टीस. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठात अर्णव गोस्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी सध्या सुरु आहे. मुंबई हायकोर्टाने सोमवारी याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता आणि कनिष्ठ कोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अर्णव यांनी अधिवक्ता निर्निमेष दुबे यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान या अपिलवर आज सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरु झाली आहे.

दरम्याम देशभरात हजारो सामान्य नागरिक न्यायाच्या प्रतीक्षेत असताना आणि कोर्टासमोर प्रकरणे न आल्याने हजारोजण तुरुंगातच असताना रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना इतकी विशेष सवलत का दिली जाते,’ असा सवाल सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरचिटणीसांना पाठविले आहे. रिपब्लिकचे अर्णव गोस्वामी यांना जामीन नाकारल्याने त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून, त्यांच्या अर्जावर आज, बुधवारी सुनावणी सुरु झाली आहे . यावर दवे यांनी आक्षेप घेतला आहे.

दुसरीकडे न्यायालयात युक्तिवादाच्या वेळी अर्नबच्या वकिलांनी आरोप केला की अन्वय नाईक यांनी आईला ठार मारून नंतर आत्महत्या केली होती. तसेच याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील न्यायालयात केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने रिपब्लिक टीव्हीवरील टोमण्याकडे दुर्लक्ष करण्याला हवं असं देखील मत व्यक्त केलं आहे. पीटीआय’ने याबाबत अधिकृत वृत्त दिलं आहे.

तत्पूर्वी माझ्या आत्महत्येला ST महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत या कंडक्टरनं टोकाचं पाऊलं टाकलं. जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने (ST Mahamandal Counductor Manoj Anil Chaudhari) सोमवारी (९ नोव्हेंबर) गळफास घेऊन आत्महत्या केली होती. चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली होती. याच विषयाचा अर्नबच्या वकिलांनी युक्तिवादात वापरून सर्वोच्च न्यायालयात प्रति प्रश्न उपस्थित केला.

 

News English Summary: Accusing the ST Corporation and the Thackeray government of being responsible for my suicide, the conductor took extreme measures. ST conductor Manoj Anil Chaudhari from Jalgaon (ST Mahamandal Counductor Manoj Anil Chaudhari) committed suicide by hanging himself on Monday (November 9). Chaudhary had also written a suicide note before committing suicide. Arnab’s lawyers used the same subject in their arguments and presented counter-questions in the Supreme Court.

News English Title: Supreme court Arnab Goswami interim bail hearing news updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x