2 May 2024 6:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

कन्नडिगांची मुजोरी | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा जाळला

State Deputy CM Ajit Pawar, Statue fired, Karnataka

मुंबई, १८ नोव्हेंबर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray) यांचा काल आठवा स्मृतीदिन झाला. या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील शिवसैनिकांच्या, हिंदूंच्या आणि अनेक राजकीय व्यक्तींच्या मनात आदराचं स्थान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून अभिवादन करण्यात आलं.

त्यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली होती. ‘महाराष्ट्राच्या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया,’ असं अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं होतं.

मात्र त्यानंतर कन्नडिगांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. यावेळी कन्नडिगांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा जाळला आहे. याच वक्तव्याचा राग मनात धरुन प्रो कन्नडा ग्रुपने अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन करत त्यांचा पुतळा जाळला आहे. त्यांच्या वक्तव्याला प्रो कन्नडा ग्रुपने विरोध केला आहे. अजित पवार यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी कन्नडा ग्रुपने केली आहे.

 

News English Summary: Kannadiga’s mujori has come to the fore once again. On this occasion, Kannada people have burnt the statue of Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar. Angered by this statement, the Pro Kannada group has agitated against Ajit Pawar and burnt his statue. His statement has been opposed by the Pro Kannada Group. The Kannada group has demanded that Ajit Pawar withdraw his statement.

News English Title: State Deputy Chief Minister Ajit Pawar statue fired in Karnataka News updates.

हॅशटॅग्स

#AjitPawar(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x