सारखं सरकार पडणार म्हणतात | मोकळी भांडीच खूप आवाज करतात - सुप्रिया सुळे

इंदापूर, २७ नोव्हेंबर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र मागील एक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे दिल्ली ते गल्लीतील नेते महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याच्या गर्जना करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील अनेक नेत्यांनी तर थेट तारखादेखील जाहीर केल्या होत्या. मात्र दुसरीकडे भाजपचेच नेते मोठ्या संख्येने पक्ष सोडून महाविकास आघाडी पक्षातील एखाद्या पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत. त्यामुळे सत्ताधारी देखील विरोधकांची खिल्ली उडवत स्वतःचे कार्यकर्ते टिकविण्यासाठी भाजपचे नेते अशा सरकार पडण्याच्या बाता मारत असतात असं म्हटलं आहे.
आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Party MP Supriya Sule) यांनी देखील भारतीय जनता पक्षाची याच विषयाला अनुसरून खिल्ली उडवली आहे. या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, ‘जे लोक सारखं सरकार पडणार म्हणतात ते ऐकताना मला गंमत वाटते. जी भांडी मोकळी असतात ती खूप आवाज करतात. भरलेलं भांडं कधी आवाज करत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना लगावला आहे. “करायचा तेवढा आवाज करा, पडलं तर बघू काय करायचं. आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कोणी आलेलं नाही. आज आम्ही आहोत कधीतरी त्यांची येईल. पण ती लवकर येणार नाही,” असंही त्या म्हणाल्या आहेत. इंदापूरात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा प्रचार करताना त्या बोलत होत्या.
“लोकं सारखं म्हणतात की हे सरकार पडणार. हे ऐकताना मला गमंत वाटते. मोकळी भांडी फार वाजतात. त्यामुळे भांड्यांनी करायचा तितका आवाज करा. सरकार पडलं तर बघू काय करायच ते…हे सरकार स्थिर आणि टिकणारे सरकार आहे,” असं सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितलं.
News English Summary: I find it funny to hear people say that the government will fall. Pots that are empty make a lot of noise. NCP MP Supriya Sule has accused the opposition of never making a fuss. “Make as much noise as you want to do, if it falls, let’s see what to do.” No one has come to stay in power for life. Today we will have them someday. But she will not come soon, ”she said. She was speaking while campaigning for the graduate constituency in Indapur.
News English Title: NCP MP Supriya Sule criticized BJP leaders statement over MahaVikas Aghadi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER