7 May 2025 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

UK | नव्या कोरोना व्हायरसने चिंता | सेन्सेक्स कोसळला | ५ लाख कोटींचे नुकसान

United Kingdom, new corona virus, Sensex Nifty steep

नवी दिल्ली, २१ डिसेंबर: ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्यानं केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनहून भारतात येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २२ डिसेंबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल. हा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल.

ब्रिटनचे आरोग्य चिकित्सा अधिकारी क्रिस व्हिटी यांनी कोरोना विषाणूचे नवे रुप पहिल्या विषाणूपेक्षा वेगळे असेल, असं सांगितले. या विषाणूचा वेगाने संसर्ग होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक ठिकाणी अधिक काळजी घेण्याचे आवाहन क्रिस व्हिटी यांनी केले आहे. ब्रिटनने यापूर्वीच इतर देशांनी विमानसेवांवर बंदी घालण्याबाबत सुचवले होते.

युकेमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळल्याने तिथे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लॉकडाउन पुन्हा एकदा लागू केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तिथल्या विमानांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

मात्र, नव्या प्रकाराच्या करोना विषाणूने ब्रिटनमधील परिस्थिती आणखी चिघळळी आहे. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सध्या बाजारातून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. या चौफेर विक्रीने सेन्सेक्स तब्बल २००० अंकांनी कोसळला आहे. निफ्टीत ४०० अंकांची घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

 

News English Summary: The new type of corona virus has further aggravated the situation in Britain. Frightened investors are now planning to withdraw money from the market. The Sensex has plunged as much as 2,000 points. The Nifty has fallen by 400 points, leaving investors with a loss of Rs 5 lakh crore.

News English Title: United Kingdom new corona virus Sensex Nifty steep fall today news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या