29 April 2024 5:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ | गृहिणींचे बजेट कोलमडणार

Gas cylinder, Pice Hike

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी: मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. अशातच आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे नवे दर आज दुपारी 12 वाजल्यापासून सर्वत्र लागू केले जाणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात ही दुसऱ्यांच्या गॅसच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. याआधी 4 फेब्रुवारीला गॅसचे दर वाढवण्यात आले होते. गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने दिल्लीतील ग्राहकांना तो आता 769 रुपयांना मिळणार आहे.

दुसरीकडे देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनला भिडत असल्याने लोकांचा खिसा खाली होत आहे. त्यामुळे आता मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरातही लोक वाहनांनी प्रवास करताना दहावेळा विचार करत आहेत. पेट्रोलचा दर परवडत नसल्याने गाड्या बाहेर काढायच्या की नाही, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असल्याने आता बरेच ग्राहक पेट्रोलची खरेदी टाळत असल्याचे पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

तेल उत्पादक कंपन्यांनी वाढवलेल्या किमतीमुळे देशात सलग ७व्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली. नवीन किमतीनुसार आज दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८९ रूपये होता, म्हणजे कालपेक्षा त्यात २६ पैश्यांची वाढ झाली. मुंबईमध्ये साध्या पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९५ रूपयांपेक्षा जास्त होती. तर परभणी येथे प्रीमियम (पदार्थमिश्रित) पेट्रोलच्या किमतीने शंभरी ओलांडली.

 

News English Summary: Citizens are already suffering due to the continuous rise in petrol and diesel prices over the last few days. Similarly, the price of a domestic gas cylinder has been increased by Rs 50. Therefore, the new rates for gas cylinders will be implemented everywhere from 12 noon today. This is the second increase in gas prices in February. Earlier, gas prices were hiked on February 4. With the increase in the price of a gas cylinder, consumers in Delhi will now get it at Rs 769.

News English Title: The price of a domestic gas cylinder has been increased by rupees 50 news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x