8 May 2025 6:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 09 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 09 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | 55% रिटर्न मिळेल, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
x

मराठा तरुणांसाठी ‘सारथी’अंतर्गत मोफत कोर्सेस | अधिक माहितीसाठी वाचा

Pune, free courses, Maratha community, Sarathi

पुणे, २४ फेब्रुवारी: मराठा समाजातील युवक ‘जॉब स्किल रेडी’ व्हावेत या उद्देशाने ‘सारथी’मार्फत (छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे) विशेष कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मराठा, कुणबी समाजाच्या तरुणांना याअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विविध कोर्सेसचा लाभ घेता येणार आहे.

फील्ड टेक्निशियन (संगणक आणि हार्डवेअर), फील्ड टेक्निशियन (नेटवर्किंग आणि स्टोरेज) आणि मोबाइल फोन हार्डवेअर दुरुस्ती तंत्रज्ञ अशी तीन कौशल्य कोर्सेस असून, ती प्रत्येकी दोन महिन्यांची आहेत. त्यासाठी पात्रता अनुक्रमे १२ वी उत्तीर्ण, पदविका उत्तीर्ण, १० वी उत्तीर्ण अशा आहेत. तिन्ही कोर्सेस पूर्णपणे नि:शुल्क आहेत. शिवाय निवड झालेल्या सर्व उमेदवारांना उपस्थिती ९० टक्क्यांवर असल्यास रोज ७५ रुपये भत्ता दिला जाणार असून, या व्यतिरिक्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीबाहेरून येणाऱ्या उमेदवारांना रोज ३०० रुपये निवास भत्ता दिला जाणार आहे, त्यासाठीदेखील ९० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.

मराठा, कुणबी समाजातील पात्रता प्राप्त तरुणांनी या कोर्सेसचा लाभ होऊन स्वयंरोजगार कुशल होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन ‘सारथी’ने केले आहे. अधिक माहितीसाठी १२८९, जंगली महाराज रस्ता, (गंधर्व हॉटेलच्या मागे, हॉटेल स्वान इन समोर शिवाजीनगर, ४११००५), ०२०२५५३०२९१, ९१७५९७४३६८ या ठिकाणी प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन अस्पायरच्या वतीने करण्यात आले आहे.

 

News English Summary: A special skill development program is being implemented through ‘Sarathi’ (Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute, Pune) with the objective of making the youth of Maratha community ‘Job Skill Ready’. The youth of Maratha and Kunabi communities will be able to take advantage of various courses started under this. Eligible youth from Maratha and Kunbi communities should take advantage of these courses and try to become self-employed, Sarathi has appealed. For more information, please contact 1289, Jangali Maharaj Road, (Behind Gandharva Hotel, Opposite Hotel Swan Inn, Shivajinagar, 411005), 02025530291, 9175974368, on behalf of Aspire.

News English Title: Pune free courses for Maratha community youth under Sarathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या