7 May 2025 5:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

स्विस बँकेतील काळा पैसा बाहेर काढणं दूरच, उलट ५० टक्क्यांनी भारतीयांचा पैसा वाढला

नवी दिल्ली : देश विदेशातील काळ्या पैशावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आणल्याच्या मोदी सरकारच्या दाव्याला स्विस नॅशनल बॅंकेकडून सादर करण्यात आलेल्या अहवालामुळे मोठा धक्का बसला आहे. कारण त्या अहवालानुसार स्विस बॅंकेत असणारे भारतीयांच्या पैशावर ५० टक्क्यांनी वाढ होऊन ही रक्कम जवळपास ७००० हजार कोटीच्या घरात गेली आहे.

स्विस नॅशनल बॅंकेच्या अहवालानुसार भारतीयांनी थेट स्वरूपात ठेवण्यात आलेल्या रकमेनुसार ९९.९ कोटी स्विस फ्रँक व इतर माध्यमातून जमा करण्यात आलेल्या पैशात १.६ कोटी स्विस फ्रँक ऐवढी प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे २०१७ या आर्थिक वर्षात खात्यात थेट जमा झालेल्या रकमेत वाढ होऊन ती ६८९१ कोटी रुपये इतकी वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो.

विशेष म्हणजे सरकारने काळ्या पैशाबाबत अभियान सुरु करून सुद्धा स्विस बॅंकेत भारतीयांच्या खात्यातील रकमेत वाढ झाली आहे. स्वित्झर्लंडमधील स्विस बॅंकेत ग्राहकांची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात येते म्हणून येथे मोठ्या प्रमाणावर काळा पैसा जमा होत असतो. २०१६ या आर्थिक वर्षात भारतीयांच्या पैशाचा तोच आकडा ४५ टक्के इतका होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या