EPFO | नोकरी सोडल्यानंतर PF अकाऊंटवर किती मिळतं व्याज? | सविस्तर माहिती

मुंबई, १९ मार्च: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आर्थिक वर्ष 2019-20 साठी ईपीएफवर निश्चित 8.5 टक्के व्याज एकरकमी देत आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत माहिती दिली होती. या निर्णयामुळे ईपीएफओच्या जवळपास 6 कोटी सब्सक्रायबर्सवर परिणाम होणार आहे.
कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही असे म्हटले होते की, 2019-20 साठी ईपीएफवर 8.5 टक्के दराने व्याज देण्याचा प्रयत्न आम्ही करू. आम्ही 019-20 साठी ईपीएफवर 8.5 टक्के दराने व्याज देण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. आम्ही खातेधारकांच्या खात्यात व्याजदर जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.’ त्यामुळे हे व्याज जमा झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये बॅलन्स किती आहे हे तुम्ही विविध पर्यायांच्या माध्यमातून तपासू शकता.
दरम्यान, कोरोनाच्या भीतीमुळे, अनेक लोक मोठी शहरे सोडून छोटी शहरे आणि खेड्यात गेले. अनेक लोक कंपनी सोडून दुसर्या कंपनीत गेले. या व्यतिरिक्त असे बरेच लोक आहेत जे सेवानिवृत्तीपूर्वी नोकरी सोडतात. तुम्हीही यातील एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. खरंतर, बरेच लोक नोकरी सोडल्यानंतर त्यांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) हस्तांतरित करण्यास विसरतात. पण यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागेल.
नोकरी सोडणारे बहुतेक लोक समाधानी आहेत कारण त्यांना पीएफ खात्यावर उत्तम व्याज मिळतं. म्हणून तुम्हाला हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, पहिल्या 36 महिन्यांत कोणतेही कॉन्ट्रिब्यूशन (Contribution) नसल्यास, कर्मचार्यांचे पीएफ खाते निष्क्रिय खात्याच्या (In Operative Account) श्रेणीमध्ये ठेवले गेले होते. अशा परिस्थितीत आपले खाते चालू ठेवण्यासाठी आपल्याला तीन वर्षांपूर्वी काही रक्कम काढावी लागेल.
आताच्या नियमांनुसार जर कर्मचारी 55 वर्षांच्या वयात सेवानिवृत्ती (Retirement) घेत असेल आणि 36 महिन्यांच्या आत जमा रक्कम काढण्यासाठी अर्ज न केल्यास पीएफ खाते निष्क्रिय होईल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, कंपनी सोडल्यानंतरही पीएफ खात्यावर व्याज दिले जाईल आणि 55 वर्ष वयाच्या होईपर्यंत निष्क्रिय होणार नाही.
वेबसाइटच्या माध्यमातून अशाप्रकारे तपासा तुमचा बॅलन्स:
याकरता तुम्हाला Epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. याठिकाणी तुमचा UAN क्रमांक, पासवर्ज आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून ई-पासबुकवर क्लिक करा. याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा आणि अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता.
मिसकॉल देऊन तपासता येईल तुमचा PF बॅलन्स:
यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता
News English Summary: According to the current rules of EPFO, if the employee is retiring at the age of 55 and does not apply for withdrawal within 36 months, the PF account will be deactivated. Simply put, interest will be paid on the PF account even after leaving the company and will not be inactive until the age of 55.
News English Title: How much interest get on EPFO account even after leaving job news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER