2 May 2025 10:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या अभिनेत्याचं मनसेतर्फे मनापासून अभिनंदन - राज ठाकरे

MNS chief Raj Thackeray, Rajinikanth, Dadasaheb Phalke Award

मुंबई, ०१ एप्रिल: सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव केला जाणार असल्याची घोषणा केली.

दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचं अभिनंदन केलं आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करुन रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी ”कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या या अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अभिनंदन” असं म्हटलं. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा आज सकाळी केली.

राज ठाकरे यांनी अभिनंदन देताना काय म्हटलं आहे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “रजनीकांतना काहीच अशक्यन नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे न पाहिलेला पण हिरहिरने एकमेकांना पाठवतो. ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन, रजनीकांत ह्या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पंथ निर्माण होतो, आणि इतकं असताना हाच अभिनेता अपूर्व प्रसिद्धीच्या झोतात देखील सिनेमातील पात्राची झूल उतरवून सामान्य माणसासारखा जगू शकतो, असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार. रजनीकांत ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाही झाला. कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या या अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन, अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी रजनीकांत यांचं दादासाहेब फाळके पुरस्करा मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.

 

News English Summary: MNS president Raj Thackeray has congratulated southern superstar Rajinikanth. Raj Thackeray tweeted congratulations to Rajinikanth on the announcement of Dadasaheb Phalke Award. On this occasion, he said, “Congratulations from Maharashtra Navnirman Sena to this actor who considers the debt of Karmabhoomi to be immense.”

News English Title: MNS chief Raj Thackeray tweeted congratulations to Rajinikanth on the announcement of Dadasaheb Phalke Award news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या