3 May 2025 10:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

सरकार पाडण्यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे - आ. रोहित पवार

NCP MLA Rohit Pawar, BJP, Corona pandemic, Vaccination

मुंबई, ९ एप्रिल: देशात कोरोना व्हायरसची परिस्थिती दररोज बिघडत आहे. संक्रमितांची प्रकरणे रोज नविन विक्रम बनवत आहेत. गेल्या 24 तासांच्या आत देशात 1 लाख 31 हजार 878 लोक संक्रमित आढळले आहेत. गेल्या वर्षी व्हायरस आल्यानंतरपासून आतापर्यंतचा हा एका दिवसातील रुग्णांचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी बुधवारी देशात सर्वात जास्त 1 लाख 26 हजार 276 लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

गुरुवारी रिकव्हर होणाऱ्यांचा आकडा 61 हजार 829 राहिला. संक्रमणामुळे होणाऱ्या मृतांची संख्या 802 राहिली. 17 अक्टोबरनंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एका दिवसाच्या आत 800 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. 17 अक्टोबरला 1032 रुग्णांनी जीव गमावला होता.

देशात आणि राज्यात अशी स्थिती असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकारण लस पुरवठ्यावरून ढवळून निघालं आहे. यावरून महाविकास आघाडीची नेते मंडळी देखील भाजपच्या राजकारणाला प्रतिउत्तर देतं आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे.

रोहित पवार यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कोरोना लसीकरण मोहिमेवर भाष्य करत विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेश आणि राज्याला मिळालेल्या कोरोना लसीच्या तुलनेबाबत केलेल्या विधानाचा आमदार रोहित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. लस वितरण लोकसंख्येच्या आधारावर होत नसूनही विरोधक महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशशी करतायेत. केंद्र सरकारच्या गृहितकानुसार वेस्ट रेट हा १०% असू शकतो, पण आपण तो अवघा ३% ठेवला. राज्यातील रुग्णसंख्या बघता लस पुरवठा किती व्हावा, याचा विरोधकांनी विचार करावा, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

महाराष्ट्राला १.०६ कोटी डोस मिळाले असून, आपण दोन्ही डोस मिळून ९३.३२ लाख लोकांचं लसीकरण पूर्ण केलं तर ३ लाख डोस वाया गेले. आपल्याकडे १० लाख डोस शिल्लक असून ते परवापर्यंत संपतील. आज काही ठिकाणी लसीचा साठा संपला. त्यामुळे लसीकरण ठप्प झालं. वास्तविक आपण लसीकरणाचा वेग वाढवलाय. लसीकरण केंद्रावर नोंदणी केल्यानंतर अवघ्या पाच-दहा मिनिटांत लस दिली जातेय. पण मागणीच्या प्रमाणात पुरवठा लस उपलब्ध नसल्याने लसीकरणामध्ये अडथळा निर्माण होतो, असे रोहित पवार यांनी सांगितले.

काय आहे नेमकी पोस्ट;

#MaharashtraNeedsVaccine

लस वितरण लोकसंख्येच्या आधारावर होत नसूनही विरोधक महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशशी करतायेत….

Posted by Rohit Rajendra Pawar on Thursday, April 8, 2021

 

News English Summary: With such a situation in the country and the state, on the other hand, politics in Maharashtra has been shaken by the supply of vaccines. The leaders of Mahavikas Aghadi are also responding to the politics of BJP. NCP MLA Rohit Pawar has also told Devendra Fadnavis.

News English Title: NCP MLA Rohit Pawar criticised BJP over politics in corona pandemic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या