नागपूर : आज सभागृहाचं कामकाज सुरु होताच नाणार रिफायनरी विषयाला अनुसरून शिवसेनेचे काही सदस्य हातात बॅनर घेऊन आणि घोषणा देत अध्यक्षांच्या आसनासमोर आले. परंतु आमदार नितेश राणे थेट सभापतींच्या समोर गेले आणि सभापतींसमोर ठेवलेल्या राजदंडाजवळ पोहचले. परंतु आक्रमक झालेले आमदार नितेश राणे थेट सभापतींच्या राजदंडापर्यंत पोहोचल्याचे दिसताच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, वैभव नाईक, राजेश क्षीरसागर व राजेंद्र साळवी सुद्धा सभापतींच्या आसनाजवळ पोहोचले.

परंतु आमदार सभापतींच्या बाजूला जमल्याचे पाहून सभागृहातील दोन मार्शल मात्र आमदारांच्या समोर उभे ठाकले आणि राजदंड धरून ठेवला. परंतु काही आमदारांनी राजदंड हिसकावून घेण्याचा प्रयत्नं केला खरा, परंतु दोन मार्शल सोबत झालेल्या झालेल्या झटापटीत काही आमदार मात्र खाली पडले. अखेर विधानसभा अध्यक्षांनी वाढलेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार नितेश राणे म्हणाले की, मी कोकणचा आहे आणि नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे तेथील स्थानिकांचे जनजीवन प्रभावित होणार असल्याने कोकणातील जनतेचा नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. शिवसेनेचे आमदार केवळ घोषणा देत होते, परंतु सभागृहात जेव्हा मी आक्रमक होऊन राजदंड उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास येताच शिवसेनेच्या आमदारांना जाग आली आणि नंतर ते माझ्या पाठी मागून तेथे पोहोचले. परंतु स्वतः सत्तेत समान वाटेकरी असलेली शिवसेना राजदंड कशी पळवू शकते असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला. तसेच नाणार प्रकल्पाच्या विषयावर शिवसेनेची भूमिका म्हणजे केवळ नाटकं असून तो कोकणी जनतेला माहित आहेत असं नितेश राणे म्हणाले.

MLA Nitesh rane gone very aggressive during Nagpur Manson session on Nanar Refinery issue