नवी दिल्ली, १९ एप्रिल: राज्यात एका बाजूला कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवत असताना दुसऱ्या बाजूला राजकारण सुरू आहे. रेमडेसिविर इंजेक्शनवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात सुरू असलेला वाद दोन दिवसांपूर्वी थेट पोलीस ठाण्याक गेला. दमणस्थित ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  प्रविण दरेकर यांनी रात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली. भाजपचे नेते बराच वेळ पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.

दरम्यान भाजपच्या या भूमिकेवर काँग्रेसनंदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी रेमडेसिवीर खरेदी प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीची मागणी केली आहे. दिग्विजय सिंग यांनी ट्विट केलं असून हा अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचं म्हटलं आहे.

दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत म्हटलं की, “खरं तर फडणवीसांनी कोणत्या खात्यातून साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी केले याची चौकशी झाली पाहिजे. तसंच कोणाच्या परवानगीने केले याचीही चौकशी झाली पाहिजे. ही अत्यंत लाजिरवणी बाब आहे”.

 

News English Summary: Digvijay Singh tweeted, “In fact, the account from which Fadnavis bought Remedesivir worth Rs 4.5 crore should be investigated.” It should also be inquired as to whose permission was given. It’s a shame.

News English Title: Devendra Fadnavis should investigated in Remedesivir injection purchase said congress leader Digvijay Singh news updates.

रेमडेसिवीर खरेदीसाठी ४ कोटी ५० लाख कोणत्या खात्यातून दिले आणि GST? | फडणवीसांची चौकशीची करा – काँग्रेस