4 May 2025 3:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Health first | जाणून घ्या सदाफुलीच्या झाडाचे विशेष गुणधर्म

benefits of periwinkle

मुंबई २० एप्रिल : सदाफुली भारतात सर्वसाधारणपणे सगळीकडे आढळणारे फुलाचे झाड आहे. हे झाड सजावटीसाठी असते. तसेच यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. या फुलांच्या पाकळ्या चमकदार, गहऱ्या रंगाच्या असतात. हे फुल टाईप २ डायबिटीज असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. सकाळी फुले आणि पानांपासून बनवलेली हर्बल चहा डायबिटीजमध्ये उपयुक्त ठरते.

हे फुलझाड जास्तीत जास्त एक मीटर उंचीपर्यंत वाढू शकते. या फुलांचा रंग गुलाबी, बैंगणी किंवा पांढरा असतो. हे फुलझाड बियांपासून किंवा कटिंगद्वारेही लावता येऊ शकते. हे फुलझाड वर्षभर बहरणारे आहे. याच्या पानांची चव कडवट असल्याने वन्य पाणी हे झाड खात नाहीत. या झाडावर कीड दिसून येत नाही, तसेच साप, विंचू, इत्यादी या झाडाचा आसपास येत नाहीत. या झाडाची पाने गळून पडल्यानंतर विघटीत होऊन मातीतले हानिकारक घटक नष्ट करतात.

सदाफुलीच्या मुळ्यांवरील साल औषधी मानली गेली आहे. यामध्ये विविध प्रकारचे क्षार असून, ‘एजमेलिसीन’ आणि ‘सरपेंटीन’ हे दोन क्षार सर्पगंधा समूहाशी संबंधित आहेत. सदाफुलीच्या मुळ्या शरीरातील रक्त शर्करा कमी करण्यास सहायक आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये या फुलझाडाचा उपयोग मधुमेहावर पारंपारिक उपचारपद्धतीच्या अंतर्गत केला जात आला आहे. मधमाशी किंवा इतर किड्यांच्या डंखावर या झाडाच्या पानांचा रस गुणकारी असल्याचे म्हटले जाते.

महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव प्रमाणाबाहेर जास्त होत असल्यास या झाडाच्या मुळ्यांचा वापर औषध म्हणून केला जातो. या झाडाच्या मुळ्यांच्या सालीचा वापर उच्चरक्तदाब, अनिद्रा आणि नैराश्य, चिंतारोग (anxiety) यांसारख्या काही मानसिक विकारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. ही साल वेदनाशामकही आहे. या झाडाच्या पानांमध्ये जीवाणूनाशक तत्वे आहेत. त्यामुळे अनेक तऱ्हेच्या संक्रमणांवर उपचार म्हणून पानाच्या रसाचा वापर करण्यात येत असतो.

 

News English Summary: Periwinkle is the most common flowering tree in India. This tree is for decoration. It also has many medicinal properties. The petals of this flower are bright, dark in color. It is beneficial for people with full type 2 diabetes. Herbal tea made from flowers and leaves in the morning is useful in diabetes.

News English Title: Periwinkle is beneficiary to us news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या