नवी दिल्ली, २२ एप्रिल: देशात कोरोना महामारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 3 लाखांवर सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे. देशात ऑक्सिजन, बेड्स, अत्यावश्यक औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवायला लागत आहे. गेल्या आठवड्यांपासून देशात दररोज अडीच लाखांवर लोक कोरोनाच्या विळ्याख्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांना संवाद साधला होता. मात्र तोपर्यंत देशातील स्थिती कोरोनामुळे प्रचंड बिघडल्याच तज्ज्ञांनी म्हटलंय.
दरम्यान, देशात बुधवारी ३.१४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. १५ महिन्यांच्या कोरोना काळात एखाद्या देशात एक दिवसात आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या सर्वात मोठी आहे. एवढेच नव्हे, बुधवारी देशात २,१०१ रुग्णांचा मृत्यू झाला. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असली तरी अमेरिकेच्या तुलनेत ती निम्मी आहे. देशात नव्या रुग्णांची संख्या १ वरून ३ लाख होण्यासाठी फक्त १५ दिवस लागले. या काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांतही संसर्ग वेगाने वाढला. ६ एप्रिलला देशात १ लाख रुग्ण आढळले तेव्हा त्यात महाराष्ट्रातील ४८% रुग्ण होते. देशातील इस्पितळांमध्ये आणि इस्पितळांबाहेर, स्मशान भूमी बाहेर असं सर्वत्र रुग्णांच्या नातेवाईकांना हतबल झाल्याचं चित्रं आहे.
त्यालाच अनुसरून तृणमूलच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारवर मोजक्या शब्दात टीकास्त्र करताना भारतीयांची सध्याची अवस्था देखील मांडल्याचे पाहायला मिळत आहे. महुआ मोईत्रा यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “ही ‘मोदी मेड आपत्ती’ असहाय्यपणे बघत राहण्यापलीकडे भारतीयांच्या हातात काहीच शिल्लक नाही”.
Indians watching helplessly as this Modi Made Disaster explodes
— Mahua Moitra (@MahuaMoitra) April 22, 2021
News English Summary: Trinamool leader Mahua Moitra, while criticizing the Modi government in a few words, is also seen presenting the current situation of Indians. Mahua Moitra tweeted, “Indians watching helplessly as this Modi Made Disaster explodes”.
News English Title: Indians watching helplessly as this Modi Made Disaster explodes said TMC leader Mahua Moitra news updates.
