4 May 2025 12:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

इनकम टॅक्सची नवी वेबसाईट आणि फक्त 10 मिनिटात पॅन कार्ड | कसा अर्ज कराल?

income tax website

मुंबई, १२ जून | जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल आणि तुम्हाला ते बनवायचं असेल तर आता हे काम अगदी सोपं झालं आहे. यासाठी कोणत्याही मध्यस्थाची म्हणजेच एजंटची गरज नाही. हे काम तुम्हीही करु शकता. यासाठी तुम्हाला केवळ 10 मिनिटं पुरेशी आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून तात्काळा पॅन कार्ड बनवू इच्छि असाल तर इनकम टॅक्सच्या नव्या अधिकृत वेबसाईटवर याची सोपी पद्धत आहे. वेबसाईट बदलल्याने पॅन कार्डची पद्धत बदलली असून अधिक वेळेची बचत करणारी आहे.

विशेष म्हणजे येथे पॅन कार्ड बनवण्यासाठी कोणतेही शुल्क देण्याची किंवा कागदपत्र देण्याची गरज नाही. Instant Pan Card सुविधेमुळे विना वाट पाहता तुम्ही तात्काळ तुमची अडचण सोडवू शकता. यासाठी ऑनलाईन अर्ज करत पॅन नंबर तयार होतो. हे पॅन कार्ड इतर सामान्य पॅन कार्डप्रमाणेच वैध असतं. यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज नाही. ऑनलाईननंतर तुम्हाला पॅन कार्डची प्रत घरीही मागवता येते.

पॅन कार्डसाठी कसा अर्ज कराल?
1. Incometax.gov.in वर जा.
2. होम पेजवर Our Services या पर्यायात जाऊन See More वर क्लिक करा.
3. Instant E-Pan पर्यायावर Instant Pan Card साठी अर्ज करा.
4. नवं पॅन कार्ड बनवण्यासाठी Get New-ePIN वर क्लिक करा.
5. त्यानंतर आधार नंबर टाकून Continue वर क्लिक करा.
6. यानंतर व्हेरिफिकेशन होईल आणि आधारशी संलग्न फोनवर ओटीपी येईल.
7. यानंतर हा ओटीपी टाकून कन्फर्म करा.
8. कन्फर्म केल्यानंतर वेबसाइटवर आधार कार्डशी संबंधित माहिती दिसेल.
9. यानंतर आयडी तपासून ओके करा.

पॅन कार्ड डाऊनलोड कसा करणार?
1. यानंतर वेबसाईटच्या होम पेजवर जाऊन पुन्हा Our Services पर्यायावर See More येथे क्लिक करा.
2. Instant E-Pan वर क्लिक करा आणि चेक स्टेट्स लिंकवर क्लिक करा.
3. यानंतर आधार नंबर टाका.
4. ओटीपी टाका.
4. तुम्हाला तुमचं पॅन कार्ड दिसेल, ते डाऊनलोड करा.
5. हे ईपॅन डाऊनलोड करुन प्रत्येक ठिकाणी वापरता येतं.

 

News Title: Know steps how to apply for Pan Card within 10 Minutes on new income tax department website news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या