16 May 2024 5:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

मोदींच्या राज्यात पेट्रोल-डिझेल किमतीच्या भडक्याने लोकांच्या खिशाला आग | अजून विक्रमी दरांकडे कूच

Petrol Diesel

नवी दिल्ली , १३ जून | देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज पेट्रोलचा दर 27 पैशांनी तर डिझेलचा दर हा 23 पैशांनी वाढला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 102.30 रुपये असून डिझेलची किंमत ही 94.39 रुपये इतकी आहे. देशातील एकूण सहा राज्यांत पेट्रोलचे दर हे शंभरीपार झाले असून डिझेलचा प्रवासही शंभरीकडे सुरु आहे.

राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ही 96.12 रुपये आहे तर डिझेलची किंमत ही 86.98 रुपये इतकी आहे. शहरांचा विचार करता भोपाळमध्ये सर्वाधिक म्हणजे 104.29 रुपये पेट्रोलचा दर तर 95.60 रुपये इतका डिझेलचा दर आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यामध्ये देशातील सर्वाधिक दराने पेट्रोल आणि डिझेलची विक्री होत आहे. त्या ठिकाणी पेट्रोल हे 107 रुपये तर डिझेल हे 100.05 रुपये इतके आहे.

पुढील विक्रमी दारांकडे वाटचाल:
पेट्रोल-डिझेलच्या विक्रमी दरांनंतर तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पेट्रोलचे दर १२१ रुपये प्रतिलिटर पार होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे आधीच वाढलेल्या महागाईमुळे त्यात अजून भर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतं आहे.

 

News Title: Petrol Diesel news high record in the India news updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x