27 April 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार
x

पेट्रोल-डिझेल दरवाढ | 7 राज्यांमध्ये पेट्रोल 100 च्या पुढे | या ठिकाणी 107.53 रुपये लीटर

petrol diesel price

मुंबई, १५ जून | देशामध्ये महागाई सर्व रेकॉर्ड तोडत आहे. गेल्या 25 दिवसांत पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 6 रुपयांपेक्षा जास्त महाग झाले आहेत. गेल्या 42 दिवसात 24 वेळेस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. तेलाच्या महागाईमुळे सामान्य माणूस त्रस्त आहे. यावर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान तेलाच्या वाढत्या दराबाबत म्हणाले की, “मी हे मान्य करतो की आजच्या किंमतीमुळे नागरिक आणि ग्राहकांना समस्या निर्माण होत आहेत, यात काही शंका नाही.’ सरकारने हे मान्य केले आहे परंतु त्यांच्याकडे महागाईवर इलाज नाही.

देशात प्रथमच डिझेलची किंमतही 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. इतकेच नव्हे तर सध्या देशातील 148 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. 9 राज्यांचे लोक 100 रुपये प्रतिलिटर पेट्रोल खरेदी करत आहेत.

येथे पेट्रोल 107 रुपयांवर:
मध्य प्रदेशच्या अनुपपूर जिल्ह्यात पेट्रोल 107.17 रुपये आणि डिझेल 98.29 रु. प्रति लिटरपर्यंत गेले आहे. मात्र, दिल्लीत पेट्रोल 96.29 रुपये आणि डिझेल 87.28 रु. आहे. या वर्षी 1 मेपासून आतापर्यंत 24 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. 21 दिवस याचे दर स्थिर ठेवले आहेत.

दिलाशाची अपेक्षा नाही : एसबीआय रिसर्च
एसबीआय रिसर्चच्या एका अहवालानुसार, पेट्रोल-डिझेलवर लागू जीएसटी आणि उत्पादन शुल्कातून सरकारला होत असलेले उत्पन्न अर्थसंकल्पातील अंदाजापेक्षा जास्त आहे. यावर एसबीआयचे समूह आर्थिक सल्लागार सौम्यकांती घोष यांच्या म्हणण्यानुसार, महामारीत सरकारी खजिन्यासाठी पेट्राेल-डिझेलचे दर बफरप्रमाणे काम करत आहेत. यात घट येण्याची शक्यता नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Huge fuel price hike 24 times in 42 days petrol above rupees 100 in 7 states in India news updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x