मुंबई, १७ जून | एकाबाजूला शिवसेनेच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीबरोबर युती करणार असल्याचं उघड उघड जाहीर केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी या युतीचा पुनरुच्चार केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा पुनरुच्चार केला आहे. हल्ली राजकीय पक्षांना स्वबळाचं अजीर्ण नक्कीच झालं आहे. भारतीय जनता पक्ष म्हणतो आम्ही स्वबळावर लढू. भारतीय जनता पक्ष एकटाच आहे. त्यामुळे स्वागत आहे.

तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. सरकारमध्ये राहणार पण स्वबळावर लढणार, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. मग राहिले कोण? तर शिवसेना आणि राष्ट्रवादी. हे दोन्ही पक्ष राज्यातील प्रमुख आणि मोठे पक्ष आहेत. आम्ही दोघांनीही स्वबळाची भाषा केली नाही. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल, असं राऊत म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: If NCP and Shivsena will have fight together it will miracles in Maharashtra says Shivsena MP Sanjay Raut news updates.

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल – संजय राऊत