5 May 2024 9:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मोदी हैं तो मुमकिन हैं | जनता गॅसवर, पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

LPG cylinder price

नवी दिल्ली, ०१ जुलै | मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील सामान्य जनता महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीमुळे प्रचंड त्रस्त आहे. विशेष म्हणजे मोदी सरकार यावर कोणत्याही उपाययोजना देखील करताना दिसत नसल्याने सामान्यांचं जगणं कठीण होऊ बसलं आहे.

कारण आता सरकारी इंधन कंपन्यांनी विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरच्या दरात २५.५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत स्वयंपाकाच्या गॅसच्या एका सिलिंडरसाठी ८३४.५० रुपयांना मिळेल. आतापर्यंत हा सिलिंडर ८०९ रुपयांना मिळत होता. देशाच्या इतर भागांमध्येही सिलिंडरचे दर वाढले आहेत.

याआधी १ मे रोजी गॅस कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. एप्रिलमध्ये सिलिंडरच्या दरात १० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्याआधी फेब्रुवारी, मार्चमध्ये सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. मुंबईत गेल्या महिन्यात ८०९ रुपयांना मिळणारा १४.२ किलोचा सिलिंडर आता ८३४.५० रुपयांना मिळेल. कोलकात्यात याच सिलिंडरसाठी ८६१ रुपये मोजावे लागतील. आधी याच सिलिंडरची किंमत ८३५.५० रुपये इतकी होती. चेन्नईत आधी ८२५ रुपयांना मिळणारा सिलिंडर ८५०.५० रुपयांना मिळेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: LPG cylinder price raised by rupees 25 in Mumbai become it cost become rupees 834 news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x