4 May 2025 1:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

BREAKING | ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधातही ईडीकडे तक्रार

Minister Nitin Raut

नागपूर, ०१ जुलै | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता ईडीकडून उर्जामंत्री नितीन राऊत यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. नितीन राऊत यांनी अर्थिक गैरव्यवहार केला असल्याची तक्रार ईडीकडे दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार डॉ. तरुण परमार यांनी ईडीकडे केली.

ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि त्यांचे पीए यांनी अर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर केला, असा आरोप करत, मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करावी, अशी मागणी वकील परमार यांनी केली. अवैध गौण खनिज उत्खनन, पोलिसांच्या बदल्या, सरकारी जमिनीवर कब्जा करणे, अशा अनेक तक्रारींची यादी परमार यांनी ईडीकडे दिली आहे. यात मोठा भ्रष्टाचार आणि अर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात आले आहे.

नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत हा के.के. पॉवर, ए.के. लॉजिस्टिक्स व बग्गील या कंपन्यांमार्फत वीज विभागासंबंधी कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार कंत्राटामार्फत करीत आहेत. या कंत्राटातील हा गैरव्यवहार ५०० ते ६०० कोटी रुपयांचा आहे, असा आरोपही परमार यांनी केला. या सगळ्या बाबींची चौकशी करण्याची मागणी वकील परमार यांनी केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Complaint filed in ED against state minister of Mahavikas Aghadi government news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NitinRaut(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या