2 May 2024 6:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

नगरमध्ये देखील मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे | पर्यायी वंजारी नेते मोठे केले जातं असल्याचा आरोप

Pankaja Munde

नगर, ११ जुलै | भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात जागा न मिळाल्यानं मुंडे समर्थक चांगलेच नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. बीडमध्ये अनेक मुंडे समर्थकांनी भाजपच्या पदाचा राजीनामा देत आपली उघड नाराजी व्यक्त केलीय. यानंतर कुठलीही नाराजी नसल्याचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता या राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर थेट निष्ठावान नसल्याचे ठपके मारण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे वाद अजून पेटणार असल्याचं दिसतंय.

दुसरीकडे, पाथर्डीच्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमधे नाराजीचे वातावरण आहे. मंत्रीपद मुंडे यांच्यासाठी महत्वाचे नव्हते तर जनतेसाठी महत्वाचे होते. पक्षासाठी मुंडे घराण्याचा त्याग केंद्रातील व राज्यातील भाजपाचे नेतृत्व कसे विसरले हेच समजत नाही. भारतीय जनता पक्षाचा तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे देणार असल्याचे खेडकर म्हणाले. मंत्रीपदाने प्रितम मुंडे यांना अखेरच्या क्षणी हुलकावणी दिली. विधान परीषदेवरही पंकजा मुंडे यांना घेण्याचे ठरले आणि ऐनवेळी वंजारी समाजातील दुसऱ्याच व्यक्तीला आमदार केले गेले. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना आमचा विरोध नाही.

मात्र प्रितम मुंडे यांनाही मंत्रीपदाची संधी मिळायला हवी होती. पंकजा मुंडे यांना एकाकी पाडण्याचा हा डाव पक्षाचे नेतृत्व खेळत आहे का असा प्रश्न पडला आहे. भारतीय जनता पक्ष वाढविण्यासाठी स्वर्गीय गोपिनाथ मुंडे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे योगदान पक्षाचे राज्यातील नेतृत्व कसे विसरले. आम्ही भारतीय जनता पक्षाचे पाथर्डीचे सर्वच पदाधिकारी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे राजीनामे देणार असल्याचे ते म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP Munde supporters started giving resignations in Nagar district too news updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x