4 May 2025 11:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL
x

Crime Patrol | रिक्षाचालकाने पेट्रोल टाकून दोन महिलांना जाळले | महिलांची प्रकृती चिंताजनक

Crime Patrol

नाशिक, ११ ऑगस्ट | रिक्षाचालकाने पेट्रोल टाकून फ्लॅट पेटवून दिल्याने दोन महिला जळून गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना मखमलाबाद रोडवरील शिंदे नगर येथील भाविक इमारतीत घडली. सुखदेव गुलाब माचेवाल उर्फ कुमावत असे पेट्रोलने दोन महिलांना जाळणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या दोन्ही महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत एक वयोवृद्ध आणि दोन लहान मुले बचावली, मात्र घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या आहेत. याबाबत पंचवटी पोलीस पुढील तपास करत आहेत.

जाळलेल्या दोन्ही महिलांची प्रकृती चिंताजनक:
शिंदे नगर परिसरातील भाविक या इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये प्रदीप ओमप्रकाश गौड (३९) हे आई, वडील, पत्नी, भाऊ, भावजयी, मुले आणि पुतण्यासह एकूण दहा जण राहतात. मंगळवारी सकाळी त्यांच्या घरी त्यांच्या मावशी भारती गौड या आल्या होत्या. त्यांनतर बाराच्या सुमारास त्यांच्या परिचयातील रिक्षाचालक सुखदेव गुलाब माचेवाल उर्फ कुमावत (५२, रा. कुमावत नगर) हा आपल्या हातात दोन पेट्रोलच्या बाटल्या घेऊन घरी आला. त्याने घरात असलेल्या भारती गौड यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सोबत आणलेल्या बाटल्यांमधील पेट्रोल घरात फेकायला सुरुवात केली. अचानकपणे घराला आग लावून देत तो फरार झाला. घरामध्ये प्रदीप गौड यांची आई सुशीला गौड (६५), आजोबा जानकीदास गौड (८५), पार्थ गौड (१५), चिराग गौड (३), मावशी भारती गौड (५५) हे होते. घरात झालेल्या भांडणाचा आवाज आणि घराला लागलेली आग पाहून पंधरा वर्षीय पार्थने बेडरूमचा दरवाजा लावून घेत आपल्या वडिलांना आणि आईला फोन लावून घटनेची माहिती दिली.

या आगीच्या घटनेमध्ये सुशीला गौड आणि भारती गौड या दोन्ही बहिणी गंभीररित्या भाजल्या आहेत. घराला लागलेली आग बघून आजूबाजूच्या लोकांनी अग्निशमन दलाला आणि पोलिसांना फोन करून माहिती दिली. तसेच, आजूबाजूच्या घरातून पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळविले. ही आग इतकी भयानक होती की, घरातील सर्वच वस्तू जळाल्या. दरम्यान, घटनेतील संशयित सुखदेव गुलाब माचेवाल उर्फ कुमावत हा देखील भाजलेला असून, त्याला आणि भाजलेल्या महिलांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Auto driver set blaze two women at Nashik news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या