3 May 2025 11:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

सूचना | तुम्ही, मित्रांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केलाय? | इथे पासवर्ड बदलून घ्यावेत असे आवाहन

Maharashtra Police recruitment 2019

मुंबई, २३ ऑगस्ट | पोलीस भरती पासवर्ड चेंज करा अगदी सोप्या पद्धतीने. पोलीस भरती २०१९ मधील विविध पदासाठी आवेदन केलेल्या उमेदवारांना एक सूचना महाराष्ट्र पोलीस यांचे अधिकृत संकेतस्थळ https://www.mahapolice.gov.in/ यावर देण्यात आलेली आहे. मित्रांनो एक शुद्धी पत्रक या ठिकाणी देण्यात आलेले आहे. उमेदवारांनी दिनांक २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत त्यांचे पासवर्ड बदलून घ्यावेत असे आवाहन करण्यात आलेले आहे. पोलीस भरती २०१९ मधील विविध पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारासाठी प्रसिद्ध करण्यात आलेले शुद्धीपत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा किंवा पुढील लिंक कॉपी करून ब्राऊझरवर पेस्ट करा: https://www.mahapolice.gov.in/police-recruitment/

पोलीस भरती पासवर्ड चेंज करा, पोलीस भरती २०१९ मधील विविध पदासाठी आवेदन केलेल्या उमेदवारांना एक सूचना (How to change password of Police recruitment 2019 information in Marathi) :

पोलीस भरती पासवर्ड चेंज लिंक:
पोलीस भरती पासवर्ड चेंज तर करायचा आहे पण नेमक्या कोणत्या वेबसाईटवर जाऊन हा पासवर्ड बदलायचा आहे या विषयी तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असेल तर काळजी करू नका. या ठिकाणी Police Bharti password change link किंवा पुढील लिंक कॉपी करून ब्राऊझरवर पेस्ट करा https://aurangabadrangebharti.com/ (तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे त्या घटकाच्या खाली पासवर्ड बदलण्याची लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे) दिलेली आहे त्यावर क्लिक करा. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस यांचे अधिकृत संकेतस्थळावर आणखी एक PDF फाईल दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही कोणत्या घटकासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे त्या घटकाच्या खाली पासवर्ड बदलण्याची लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल त्या घटकाखालील लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमचा पासवर्ड बदलू शकता.

शासनाच्या वेबसाईटवर पोलीस भरती पासवर्ड चेंज करण्याच्या विविध लिंक: (Police recruitment 2019 information in Marathi)

महाराष्ट्र पोलीस विभागाच्या वेबसाईटवर पोलीस भरती पासवर्ड चेंज करण्याच्या विविध लिंक एका pdf मध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरलेला असेल त्या जिल्ह्याच्या खाली एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकला टच करून तुम्ही तुमचा पासवर्ड बदलू शकता. जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यातील उमेदवारांना त्याचा पासवर्ड बदलता येवू शकतो. कारण या चारही जिल्ह्यासाठी पासवर्ड बदलण्याची एकच लिंक या ठिकाणी दिलेली आहे.

असा बदला पोलीस पोलीस भरती २०१९ अर्जाचा पासवर्ड:
१. तुमच्या कॉम्प्युटरच्या वेबब्राउजरमध्ये यु आर एल बारमध्ये टाईप करा https://aurangabadrangebharti.com/ एंटर करा.
२. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पोलीस अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
३. या ठिकाणी तीन लिंक्स तुम्हाला दिसतील
३. A) तुमचा नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी येथे क्लिक करा.
३. B) तुम्ही तुमचे इमेल विसरलात तर येथे क्लिक करा
३. C) लॉगीन करण्यासाठी येथे क्लिक करा. यापैकी पहिल्या पर्यायावर क्लिक करा.
४. वापरकर्ता आयडी किंवा अर्ज क्रमांक टाका आणि पुढे या बटनावर क्लिक करा.
५. तुम्ही वापरकर्ता आयडी विसरला असाल तर तुमचा अर्ज क्रमांक या ठिकाणी टाका आणि पुढे या बटनावर टच करा किंवा क्लिक करा.
६. जसे हि तुम्ही पुढे या बटनावर कली कराल त्यावेळी अर्ज भरतांना जो इमेल आयडी तुम्ही नोंदविला होता त्या इमेलवर लिंक पाठविण्यासाठी लिंक पाठवा या बटनावर क्लिक करा.

पासवर्ड रिसेटची लिंक इमेलवर पाठविण्यात येते:
* तुमचा पासवर्ड रिसेट लिंक तुमच्या नोंदणीकृत इमेलआयडी वर पाठविला गेला आहे असा संदेश या ठिकाणी तुम्हाला दिसेल.
* तुमचा इमेल चेक करा. तुमच्या इमेलवर पासवर्ड रिसेटची लिंक आलेली असेल. पासवर्ड रिसेट करण्यासाठी त्या लिंकवर क्लिक करा.
* मित्रांनो पासवर्ड रिसेट लिंकवर क्लिक करताच तुमचा वापरकर्ता आयडी या ठिकाणी तुम्हाला दिसेल. पहिल्या चौकटीमध्ये नवीन पासवर्ड टाकायचा आहे आणि तोच पासवर्ड तुम्हाला पासवर्ड पुष्टी करा या दुसऱ्या चौकटीमध्ये टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड रिसेट करा या लिंकवर क्लिक करायचे आहे.
* उमेदवाराने पासवर्ड सेट करतांना असा पासवर्ड सेट करायचा आहे ज्याची लांबी ६ ते २० शब्दामध्ये असेल. या पासवर्डमध्ये एक अप्पर केस म्हणजेच कॅपिटल वर्ड एक छोटा शब्द म्हणजेच लोअर केस, एक अंक आणि एक विशेष वर्ण म्हणजेच @,# &,$ या प्रकारे.
* पासवर्ड यशस्वीपणे बदलला आहे असा संदेश या ठिकाणी तुम्हाला दिसेल. पासवर्ड यशस्वीरित्या अद्यतनीत केला आहे. लॉगीन करण्यासाठी येथे क्लिक करा.

नवीन पासवर्डचा उपयोग करून लॉगीन करा:
* दोन प्रकारे तुम्ही या ठिकाणी लॉगीन करू शकता पहिला पर्याय आहे वापरकर्ता आयडी आणि दुसरा पर्याय आहे अर्ज क्रमांक.
* वापरकर्ता आयडी किंवा अर्ज क्रमांक टाका त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका आणि सर्वात शेवटी सुरक्षा कोड म्हणजेच कॅपचा टाकून लॉगीन करा.
* तर अशा प्रकारे या ठिकाणी यशस्वीपणे लॉगीन झालेले आहे.

ज्या तरुणांनी पोलीस भरतीचे अर्ज भरलेले आहेत परंतु त्यांना अद्यापही पासवर्ड कसा बदलावा लागतो हि माहिती नाही अशा तरुणांना हा लेख शेअर करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Job Title: How to change password of Police recruitment 2019 information in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या