5 May 2024 10:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

खासदार-आमदारांच्या प्रकरणात सीबीआयसह ईडीकडून दिरंगाई | सुप्रीम कोर्टाची नाराजी

Supreme Court

नवी दिल्ली, २६ ऑगस्ट | खासदार आणि आमदारांविरोधातील प्रकरणात ईडी आणि सीबीआयकडे मोठ्या प्रमाणात प्रलंबित प्रकरणे आहेत. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयातील पीठाचे मुख्य न्यायाधीश, सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमदार-खासदारांच्या विरोधातील तपास प्रकरणात दिरंगाई होण्यामागे कारणही तपास संस्थांनी दिले नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे.

खासदार, आमदारांच्या प्रकरणात सीबीआयसह ईडीकडून दिरंगाई, सुप्रीम कोर्टाची नाराजी – Delay in disposal of cases in CBI supreme court not happy :

राजकीय नेत्यांविरोधात वेगाने खटले चालवावित व त्यांना निवडणूक लढविण्यावर बंदी घालावी, अशी याचिका भाजपचे सदस्य आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात 41 खासदार आणि 71 विधानसभा व विधानपरिषदेचे आमदार यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचा अहवाल अॅमिस्क क्युरी विजय हंसारिया यांनी दाखल केला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडे जन्मठेपेसारख्या 58 गंभीर प्रकरणासह एकूण 151 प्रकरणे प्रलंबित आहेत. तपास संस्थांकडून 10 ते 12 वर्षांमध्ये चार्जशीटही दाखल झाली नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. प्रकरणे निकालात काढण्यासाठी कशामुळे उशीर होत आहे, याचे कारणही नव्हते.

सीबीआय न्यायालयात 300 ते 400 प्रकरणे:
सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा म्हणाले, की आम्हाला तपास संस्थांबाबत काहीही म्हणण्याची इच्छा नाही. तपास संस्थांचे मनोधैर्य कमी करण्याची इच्छा नाही. मात्र, आकडे बोलतात. सीबीआय न्यायालयात 300 ते 400 प्रकरणे आहेत. हे सर्व कसे करणार? श्रीमान मेहता (महाधिवक्ता) हा अहवाल सर्वसमावेशक आहे. 10 ते 15 वर्षे आरोपपत्र दाखल न होण्यामागे कोणतेही कारण नाही. केवळ मालमत्ता ताब्यात घेतल्याने कोणताही हेतू साध्य होत नाही.

प्रकरणे निकालात काढण्यासाठी कालमर्यादा ठरवावी:
प्रकरणे वेगाने निकालात काढा म्हणणे अत्यंत सोपे आहे. मात्र, न्यायाधीश कोठे आहेत? तपासस्थांमध्ये न्यायव्यवस्थेसारख्या पायाभूत सेवेच्या समस्या आहेत. प्रत्येक मोठ्या प्रकरणात सीबीआय तपास हवा असतो. देशाचे महाधिवक्ता तुषार मेहता म्हणाले, की मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित असल्याचे मान्य आहे. त्याबाबत युक्तीवाद करण्याचा प्रयत्न करणार नाही. प्रकरणे निकालात काढण्यासाठी कालमर्यादा ठरवावी, असे मेहता यांनी सूचविले. या प्रकरणावर चेंबरमध्ये आदेश देणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Delay in disposal of cases in CBI supreme court not happy.

हॅशटॅग्स

#CBI(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x