2 May 2024 9:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

राज्यात काही लोकांचे राजकीय पर्यटन सुरू | जुने व्हायरसही परत आले, त्यांचा बंदोबस्त करायचाय - मुख्यमंत्री

Narayan Rane

मुंबई, २६ ऑगस्ट | केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतरपासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाहीये. शिवसेनेकडून नारायण राणेंवर सातत्याने टीका होत असताना दिसत आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील अप्रत्यक्ष रित्या नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्यात काही लोकांचे राजकीय पर्यटन सुरू | जुने व्हायरसही परत आले, त्यांचा बंदोबस्त करायचाय – CM Uddhav Thackeray indirectly criticized Narayan Rane without taking name :

यावेळी नारायण राणेंचे नाव न घेता टोला लगावत ते म्हणाले की, ‘राज्यात काही लोकांचे राजकीय पर्यटन सध्या सुरू आहे. हे असताना जुने व्हायरस देखील परत आले आहेत. या व्हायरसचा बंदोबस्त करावा लागेल, असा सूचक इशारा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. लोकसत्ताच्या ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021’ या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केले आहे.

व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कोरोना संकटाविषयी बोलताना म्हणाले की, आपल्याला अजून थोडे दिवस थांबावे लागेल. कोरोनाचे संकट खरंच गेले आहे का? ते अद्याप पूर्णपणे गेलेले नाही. थोडसं आहे. काही काही तर जुने व्हायरस देखील परत आले आहेत. मात्र ते व्हायरस सुद्धा कारण नसताना साईड इफेक्ट्स त्याच्यात आणत आहेत. त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे. या जुन्या आणि नव्या व्हायरसचा बंदोबस्त करु असा इशारा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला. तसेच काहीजण म्हणतील हे खुले केले ते का केले नाही. काही दिवस थांबा. टप्प्याटप्प्याने आपल्याला सर्व काही खुले करायचे आहे. एक दिवस हळूवारपणाने मास्कही काढणार आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाचे संकट अजून गेले नाही:
मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, पर्यटन हे असे क्षेत्र आहे, सर्वांना फिरण्यासाठी आवडते. काही जणांचे राजकीय पर्यटन आहे. इथून तिथे, तिथून इथे काहीजण प्रवास करत असतात. ते वेगवेगळी ठिकाणे पाहत फरत असतात. मध्यंतरी केंद्र सरकारने एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. यामध्ये त्यांनी रिव्हेंज टुरिझम हा शब्द वापरला होता. म्हणजे टुरिझम रिव्हेंज. त्यांचे म्हणणे होते, जरा सावधता बाळगा. सर्व राज्यांना हे सांगण्यात आले. कोरोनाचे संकट अद्याप गेलेले नाही. पर्यटन स्थळावर एवढी गर्दी होते की पुन्हा हे संकट येऊ शकते असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: CM Uddhav Thackeray indirectly criticized Narayan Rane without taking name.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x