4 May 2024 9:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Parenting | पालकांकडून केली जाणारी मुलांची तुलना आणि होणारे परिणाम - नक्की वाचा

Stop comparing your child to others

मुंबई, २९ ऑगस्ट | आजच्या काळात बहुतेकदा पालकांकडून मुलांची तुलना केली जाते आणि ते साहजिक सुद्धा आहे कारण आजच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी प्रत्यक्ष जण एकमेंकांशी तुलना करतच असतो पण अशावेळेला मुलांवर आपसूकच एक प्रकारचं दडपण आलेलं सुद्धा दिसून येत.

पालकांकडून केली जाणारी मुलांची तुलना आणि होणारे परिणाम – Why you should stop comparing your child to others :

हे दडपण मग करिअरचे असुदे किंवा वैयक्तिक आयुष्यचं. यातून बाहेर येणं गरजेचे असते म्हणूनच आपण याचा विचार केला पाहिजे. तुलना केली जात असताना ती सकारात्मक पद्धतीने असावी, नकारात्मक पद्धतीची नको. सकारात्मक तुलनेने आपली मुले पुढे जाऊन काहीतरी वेगळ करू इच्छितात आणि त्यातून नवीन कलाकृती निर्माण होते. जर नकारात्मक तुलना केली तर साहजिकच कोणीही तणावाचं वातावरण अनुभवेल. या गोष्टींचा विचार करणे गरजचे आहे. जर आपण आपल्या पाल्याची तुलना चांगल्या विचाराने आणि त्याच्या आवडी समजून केली तर नक्कीच ती उपयोगाची ठरेल.

स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा:
बऱ्याच वेळा पालकांना असं वाटतं की जर मुलांची इतरांशी तुलना केली तर मुलं लवकर शिकतील पण, तसं नसतं. पण, मुलांची चांगली वाढ आपल्या पालकत्वावर अवलंबून असतं. आपण मुलांना ज्याप्रकारे विचार करायला शिकवता त्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे चांगले पालक होण्यासाठी स्वतःचा सकारात्मक दृष्टीकोन असणं खूप महत्वाचं आहे.

तुलना करणं चुकीचं:
प्रत्येक मुलाचा विकास त्याच्या आसपासच्या वातावरणावरही अवलंबून असतो. शारीरिकता,सामाजिक क्षमता आणि कोणतंही काम करण्याचं कौशल्य हे सर्व तो त्याच्या घरातून आणि आसपासच्या वातावरणातून शिकतो. दोन मुलांचं संगोपन वेगळ्या प्रकारे होत असेल तर त्यांची वागण्याची पद्धत देखील वेगळीच असणार. त्यामुळे मुलांची तुलना करणे चुकीचं ठरतं.

Why Should Parents Stop Comparing Their Child to Others :

परिणाम काय होतो?
मुलांची तुलना करणाऱ्या कुटुंबात खेळीमेळीचं वातावरण राहत नाही. त्यामुळे पालक आणि मुलामध्ये अंतर निर्माण होतं. इतर अनेक प्रश्न निर्माण होतात. तुलना करण्याने मुंलांच्या मनावर दबाव येतो. जेव्हा मुलं पालकांच्या अपेक्षेनुसार वागत नाही,तेव्हा ते मनातल्यामनात भीती किंवा दडपणाखाली जगू लागतात. एवढंच नाही तर ते त्यांच्या अचीवमेन्टचा आनंदही घेऊ शकत नाही. त्यांच्या मनात हरण्याची भीती वाढायला लागते.

विश्वास दर्शवणं आवश्यक:
आपला मुलांवर पूर्ण विश्वास असल्याची भावना त्यांच्यासमोर व्यक्त करा. घरच्यांचा आपल्यावर विश्वास आहे ही भावना त्यांना जबाबदारीची जाणीव देत राहते. मुलांच्या विकासासाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे चुकीच्या गोष्टी करणं टाळतात.

प्रशंसा करा:
मुलांच्या छोट्या कामगिरीचं कौतुक करा. यामुळे त्यांच्या मनात पुढे जात राहण्याची हिंमत येईल.

संयम आवश्यक:
पेरेन्टिग म्हणजे केवळ प्रेम नाही तर, त्यासाठी संयमही महत्वाचा आहे. चूक झाल्यावर मुलांना सुधारण्याची संधी द्या. त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि आनंद घ्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Why you should stop comparing your child to others.

हॅशटॅग्स

#Parenting(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x